Latest

ओळखपत्राशिवाय 2 हजार रुपयाची नोट बदलून देण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल

नंदू लटके

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : बॅंकांमध्ये कोणत्याही ओळखपत्राशिवाय दोन हजार रुपयांची नोट बदलून देण्याची मुभा राहील, असे रिझर्व्ह बॅंक तसेच स्टेट बॅंकेने स्पष्ट केले आहे. या निर्णयाविरोधात आता दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे.

मागील आठवड्यात केंद्र सरकारने दोन हजार रुपयाच्या नोटेवर बंदी घातली होती. ३० सप्टेंबरपर्यंत बॅंकांमध्‍ये नोटा बदलून घेण्याची मुभा लोकांना देण्यात आली आहे. ओळखपत्र व तपशील असल्याशिवाय नोटा बदलून दिल्या जाणार नाहीत, अशी आधी चर्चा होती. मात्र वरील दोन्ही बाबींशिवाय नोटा बदलता येतील, असे आरबीआय आणि स्टेट बॅंकेने स्पष्ट केलेले आहे.

दोन हजाराची नोट ज्याच्याकडे आहे, त्यानेच ती बॅंकेत जमा करावी. तपशील व ओळखपत्र नसेल तर कोणीही कोणाच्याही खात्यात ही रक्कम जमा करु शकते. याद्वारे काळा पैसा पांढरा करु शकतो. त्यामुळे ओळखपत्र व तपशीलाशिवाय दोन हजारची नोट बॅंकेत जमा करण्यास मनाई करावी, असे ॲड. अश्विनी उपाध्याय यांनी जनहित याचिकेत म्हटले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT