पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
साक्री शहरातील उर्दु शाळेच्या जवळील एका घरातून गोमांस विक्री होत असल्याचा प्रकार साक्री पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाला. याप्रकरणी एका कसाईवर प्राणी संरक्षण अधिनियमनानसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस हेड कॉन्सटेबल संजय शिरसाठ यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार सकाळी आठच्या सुमारास शहरातील ओमशांती नगरातील उर्दु शाळेच्या बाजुला एका घरात गोमांसाची विक्री होत असल्याची खबर साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी. डी. रौंदळ यांना मिळाली. त्यानुसार सदर ठिकाणी पथकाने छापा टाकला असता शाहबाज शब्बीर खान कुरेशी (५७) हा इसम तीन हजार रूपये किमतीचे १५ किलो गोमांस विक्रीच्या हेतूने बाळगतांना मिळुन आला. फिर्यादीवरून साक्री शहर पोलीस ठाण्यात शाहबाज कुरेशीवर महाराष्ट्र प्राणी अधिनियम १९७६ व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमप्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.