Latest

Peru Bus Accident : पेरूमध्ये 60 प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली; 24 जणांचा मृत्यू

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण अमेरिका खंडातील पेरू देशात शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली. उत्तर पेरूमध्ये 60 प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. यामध्ये 24 जणांचा मृत्यू झाला. 'डेव्हिल्स कर्व्ह' म्हणून ओळखल्या जाणार्‍या ठिकाणी हा अपघात झाला असून अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही, अशी माहिती पोलिसांनी स्थानिक माध्यमांना दिली.

पेरूच्या उत्तरेकडील एल अल्टो जिल्ह्यातील कोरिआंका टूर्स कंपनीची बस हैती येथील लोकांसह 60 प्रवाशांना घेऊन लिमाहून निघाली होती. इक्वाडोरच्या सीमेवर असलेल्या तुंबेसकडे जात असताना, ऑर्गनोस शहराजवळ हा अपघात घडला. अपघातादरम्यान अनेक प्रवाशांनी बसमधून उडी मारून जीव वाचवले, मात्र अनेक प्रवासी बसमध्येच अडकले. जखमींवर लिमाच्या उत्तरेकडील एल अल्टो आणि मॅनकोरा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी स्थानिक माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या बसमध्ये हैती येथील काही प्रवाशी होते. बसमधील प्रवाशांची संख्या अद्याप स्पष्ट नाही. पेरूच्या वाहतूक पर्यवेक्षी एजन्सीने (SUTRAN) एका निवेदनात अपघाताची पुष्टी केली. परंतु या एजन्सीने मृतांची आणि जखमींची संख्या दिलेली नाही.

SCROLL FOR NEXT