Latest

Turkey-Syria earthquake : तुर्कीत ढिगाऱ्याखाली 163 तास मृत्यूशी झुंज, ‘त्या’ व्यक्तीची सुखरूप सुटका

दिनेश चोरगे

पुढारी ऑनलाईन :  तुर्कस्तान आणि सीरिया येथे झालेल्या विनाशकारी भुकंपामुळे ३३ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एक आठवडा उलटून गेला तरी अजूनही बचावकार्य सुरूच आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या संबधित अनेक व्हिडोओ समोर येत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये बचाव पथकाने अथक प्रयत्नानंतर एका व्यक्तीला ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. ही व्यक्ती जवळ-जवळ पाच दिवस ढिगाऱ्याखाली दबली असल्याची माहिती समोर आली आहे. (Turkey-Syria earthquake)

ब्रिटिश सर्च टीमच्या सदस्याने रविवारी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक बचाव कर्मचारी ढिगाऱ्यातून बनवलेल्या बोगद्याच्या आत जाताना दिसत आहे. त्यानंतर या बचाव कर्मचार्‍यांने कसं-बसं त्या व्यक्तीला ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. याबरोबरच रविवारी रात्री उशिरा आणखी दोन जणांचे जीव वाचवण्यातही बचाव पथकाला यश आले आहे. अनादोलू वृत्तसंस्थेने (Anadolu state news agency) सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, सात वर्षीय मुस्तफाला आग्नेय तुर्कीच्या हाटे प्रांतात वाचवण्यात आले. तर नफीज यिलमाझलाही ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. दोघेही 163 तास अडकून पडले होते.

तुर्कस्तान व सीरियामध्ये झालेल्या भयावह भुकंपामुळे अनेक देश मदतीसाठी सरसावले आहेत. ८ हजार २९४ आंतरराष्ट्रीय बचावकर्त्यांसह तुर्कीच्या संस्थांमधील ३२ हजारहून अधिक लोक बचाव कार्यात सहभागी होऊन लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार या भुकंपातील मृतांची संख्या ५० हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. (Turkey-Syria earthquake)

  हेही वाचलंत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT