Latest

चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगनंतर पुणेकरांचा एकच जल्लोष

अमृता चौगुले

पुणे, पुढारी ऑनलाईन: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या चांद्रयान ३ या मोहिमेकडे लागलं होतं. चांद्रयान-३ हे आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरलं. विक्रम लँडरने चंद्रावर सॉप्ट लँडिंग केलं. भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण देशभरात सेलिब्रेशन सुरु झालं आहे. अनेक सेलिब्रिटी ट्वीट करुन इस्रोला शुभेच्छा देत आहेत. पुणे शहरातही नागरिकांनी इस्रोचं कौतुक करत जोरदार जल्लोष केला.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ उतरताच पुण्यात फटाक्याची आताषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. इस्रोच्या चांद्रयान -३ मोहिमेत आज सायंकाळी अखेरचा व महत्वाचा टप्पा होता. हा दुर्मिळ क्षण अनेक नागरिक समाज माध्यमासह दूरचित्रवाणीवर पाहत होते. चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरताच तरुणांनी रस्त्यावर उतरत फटाक्यांची आताषबाजी करीत भारत माता की जयच्या घोषणा देत शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत झल्लोष केला. काही कार्यकर्त्यांनी पेढे व साखर वाटप केलं.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT