Latest

Pele Funeral : पेले यांच्‍या पार्थिवावर मंगळवारी सॅंटोस येथे अंत्‍यसंस्‍कार

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांच्‍या पार्थिवावर मंगळवारी ( दि. ३) सँटोस शहरात अंत्‍यसंस्‍कार होणार आहे. पेले हे सँटोस क्लबचे खेळाडू होते. या क्लबच्या घरच्या मैदानावर त्‍यांनी आपल्‍या कारकिर्दीतील काही स्‍मरणीय सामने खेळले होते. या मैदानाचे नाव व्हिला बेलेमिरो असे आहे. मेमोरियल नेक्रोपोल अक्युमेनिका सॅंटोस स्मशानभूमीत पेले यांच्‍या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या वेळी फक्त त्यांचे कुटुंबीयच उपस्थित राहणार आहेत. (Pele Funeral) दरम्यान, ब्राझील आणि जगभरातून आलेले लोक पेलेंच्या अंत्‍ययात्रेत  साओ पाउलो येथून उपस्थित राहणार आहेत. असे क्लबने एका निवेदनात म्हटलं आहे.

एडसन अरांतेस डो नॅसिमेंटो म्हणजेच पेले यांचे गुरुवार २९ डिसेंबर रोजी कर्करोगाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. क्लबने सांगितले की, तीनवेळा विश्वचषक विजेते पेले यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी सोमवारी सकाळीपासून साओ पाउलो येथील अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयातून बेलेमिरो स्टेडियमच्या मध्यभागी ठेवण्यात येईल. (Pele Funeral)

पेलेंची अंत्ययात्रा निघणार आईच्‍या घराच्‍या दारातून

पेले यांच्‍या अंतिम दर्शन सोमवारी सकाळी १० वाजता सुरू होणार आह.  मंगळवारी पेले यांचे पार्थिव सॅंटोसच्या रस्त्यांवरून आणि त्यांच्या १०० वर्षांच्या आई सेलेस्टेच्या घराजवळून नेले जाईल. ब्राझीलच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पेले यांची आईदेखील आजारी आहे. पेले यांचे सॅंटोस येथे घर आहे, जिथे त्यांनी आपले बालपण व्यतीत केले होते.

भारतीय फुटबॉल संघटनेने केला सात दिवसांचा दुखवटा जाहीर

पेले यांच्या निधनाबद्दल अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने शुक्रवारी सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला. 'एआयएफएफ'चे सरचिटणीस डॉ. शाजी प्रभाकरन म्हणाले, " पेले यांच्‍या कामगिरीचे स्मरण करण्यासाठी आम्ही सात दिवसांचा दुखवटा पाळणार आहोत." यादरम्यान 'एआयएफएफ'चा ध्वज अर्ध्यावर फडकणार आहे. प्रत्येक सामन्यापूर्वी एक मिनिटाचे मौन पाळले जाईल.

हेही वाचा; 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT