Latest

Paytm Payment Bank बाबात आणखी एक अपडेट; विजय शेखर शर्मा यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर पेटीएम पेमेंट बँकेत प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहे. दरम्यान, विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.

पेटीएम पेमेंट बँकेवर रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर बोर्डात अनेक बदल करण्यात आले आहेत. पेटीएमने सोमवारी (दि. २६) एका प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट बँकेच्या अर्धवेळ नॉन-एक्झीक्युटिव्ह अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच त्यांनी PPBL चे बोर्ड सदस्य पदही सोडले आहे.

विजय शेखर शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या बोर्डाचीही पुनर्रचना करण्यात आली आहे. ज्यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आता सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन श्रीधर हे बोर्डाचे सदस्य असतील. याशिवाय सेवानिवृत्त आयएएस देबेंद्रनाथ सारंगी, बँक ऑफ बडोदाचे माजी कार्यकारी संचालक अशोक कुमार गर्ग आणि निवृत्त आयएएस रजनी सेखरी सिब्बल हे बोर्डाचे सदस्य असतील. आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएम पेमेंट्स बँकेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. विजय शेखर शर्मा हे या बँकेचे सर्वात मोठे भागधारक आहेत.

पेटीएम पेमेंट बँक चालवण्यासाठी आरबीआयचा सल्ला

आम्ही तुम्हाला सांगतो, गेल्या आठवड्यातच भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने पेटीएम पेमेंट्स बँकेबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. वास्तविक, जर पेटीएम यूपीआय सेवा पेटीएम पेमेंटशी जोडल्या गेल्या असतील तर 15 मार्च नंतर ते कार्य करणार नाही. जर ही सेवा सुरू ठेवायची असेल तर ग्राहक आणि व्यापाऱ्यांना त्यांचे पेटीएम यूपीआय दुसऱ्या बँकेशी लिंक करावे लागेल. Paytm ची मूळ कंपनी One97 Communication Limited यासाठी 4-5 बँकांशी संपर्कात आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT