Latest

kon honaar crorepati : शोच्या मंचावर पाशा पटेल यांची हजेरी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात 'कोण होणार करोडपती'मध्ये शनिवारच्या 'विशेष भागात' पाशा पटेल हे हॉट सीटवर येणार आहेत. ( (kon honaar crorepati)) पाशा पटेल 'कोण होणार करोडपती'चा खेळ फिनिक्स फौंडेशनसाठी खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात पाशा पटेल यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. ग्रामीण भागाचा विकास लक्षात घेता पाशा पटेल यांनी २००८ साली फिनिक्स फौंडेशनची स्थापना केली. आता 'कोण होणार करोडपती'मध्ये जिंकलेली रक्कम पाशा पटेल फिनिक्स फौंडेशनच्या पुढील वाटचालीसाठी वापरणार आहेत. पाशा पटेल पहिल्यांदा एखाद्या टीव्ही रिॲलिटी शोमध्ये आले आहेत. (kon honaar crorepati)

पाशा पटेल 'कोण होणार करोडपती'च्या मंचावरून प्रेक्षकांना बांबूच्या लागवडीचे महत्त्व सांगणार आहेत. त्यांनी चक्क काही वस्तू मंचावर बरोबर आणल्या, ज्या बांबूपासून बनविल्या आहेत. बांबूच्या वस्तूंचा वापर आपण वाढवला पाहिजे, ह्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. सचिन खेडेकरांबरोबर गप्पा सुरू असताना गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींनी पाशा पटेल भावूक झाले. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू अनावर झाले. सांगितली. गोपीनाथ मुंडे यांनी पाशा पटेल यांना कशा प्रकारे मदत केली, याबद्दलची एक आठवण पाशा पटेल यांनी सांगितली.

पाशा पटेल हे विमानाने प्रवास करत नाहीत. ते पहिल्यांदा विमानात बसले तेव्हा घडलेला विनोदी किस्सा त्यांनी 'कोण होणार करोडपाती'च्या मंचावर सांगितला. आता फिनिक्स फाउंडेशनसाठी खेळताना 'कोण होणार करोडपाती'च्या खेळात ते किती रक्कत जिंकतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

'कोण होणार करोडपती'च्या खेळाबरोबरच पाशा पटेल यांचे मनोरंजक अनुभव जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका,'कोण होणार करोडपती' विशेष, २४ जून, शनिवारी रात्री ९ वाजता, सोनी मराठी वाहिनीवर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT