Latest

Party Hard : तुम्हीही ‘Party animal’ असाल तर ‘हॉलिडे हार्ट सिंड्रोम’बाबत तुम्हाला ‘हे’ माहिती हवंच

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क :  Party Hard : रात्री उशीरापर्यंत सुरू असलेल्या या पार्टयांमध्ये मद्य आणि खाण्याची रेलचेल असते. अर्थात 'पार्टी हार्ड' हे प्रकरण कितीही आकर्षक असलं तरी आपल्या शरीराला ते कितपत झेपेल याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचं आहे. सुट्ट्या असल्यावर आपल्यापैकी सगळ्यांचाच मूड निवांत होतो. अशा वेळी जीवनशैलीमध्येही कमालीचा बदल होतो. सतत काहीतरी खात राहणं, व्यायामाचा केलेला कंटाळा आणि यासोबतच मद्यपान. तुम्हाला माहिती आहे का ? हे लाईफस्टाईल कितीही आकर्षक वाटत असलं तरी अचानक जीवावर बेतण्याची शक्यता 'हॉलिडे हार्ट सिंड्रोम'मुळे कैकपटीने वाढते.

Party Hard : 'हॉलिडे हार्ट सिंड्रोम' म्हणजे काय ?

तुम्हाला ह्रदयविकार असो किंवा नसो, तुमची पार्टी करण्याची पद्धत हॉलिडे हार्ट सिंड्रोमकडे घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरते. मद्याचे एकामागे एक ४-५ पेग घेतले तर ह्रदयाचे ठोके वाढून पंपिंगमध्ये अडथळा निर्माण होतो. परिणामी व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागते.

Party Hard : पार्टीमध्ये ही लक्षणं जाणवत असतील तर…

हार्टबीट वाढणं
अचानक थकवा येणं
चक्कर येणं
छातीत दुखणं
श्वासोच्छवास करण्यास त्रास होणं

Party Hard : त्रास होऊ लागल्यास त्वरित हे करा…

मद्यपान थांबवा
हवेशीर ठिकाणी काही काळ थांबावे
कळाची तीव्रता जास्त असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या

Party Hard : पण हे अशा प्रकारे टाळणं शक्य आहे..

पार्टी करण्यापूर्वी पुरेसे हायड्रेटेड आहात याची काळजी घ्या
एकामागे एक पेग घेणं टाळा
स्मोकिंगचं प्रमाण कमी राहील याची दक्षता घ्या.
फार मसालेदार आणि कॅफिनचं सेवन नियंत्रणात राहील यांची काळजी घ्या

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT