Latest

Parliament Security Breach Case: संसद सुरक्षा भंग प्रकरण; संशयित आरोपी महेश कुमावतच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच, बुधावारी १३ डिसेंबर रोजी काही तरूणांनी सभागृहात घुसखोरी केली. याचवेळी काही तरूणांनी संसद परिसरात देखील धुराच्या नळकांड्या फोडत, सरकारविरोधी घोषणाबाजी केली. या संसद सुरक्षा भंग प्रकरणात ५ संशयित तरूणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामधील महेश कुमावत या तरूणांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. (Parliament Security Breach Case)

संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी संशयित आरोपी आरोपी महेश कुमावत याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान आज (दि.२३) त्याला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणी दरम्यान महेश याच्या पोलिस कोठडीत पुढील १३ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी ५ जानेवारी पर्यंत महेश कुमावत याच्या कोठडीत वाढ झाली आहे. (Parliament Security Breach Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेशचे इतर संसद भंग प्रकरणातील इतर आरोपींसोबत गेल्या २ वर्षांपासून संबंध होते. महेश या कटाचा भाग होता. सर्व आरोपींमध्ये झालेल्या जवळपास सर्व बैठकांना तो उपस्थित राहिला होता. तसेच मुख्य आरोपी ललित झा याच्यासोबत मोबाईल फोन आणि पुरावे नष्ट करण्याच्या कृत्यातही त्याचा सक्रिय सहभाग होता. (Parliament Security Breach Case)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT