Latest

Parliament breach case : निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलासह दाेघे ताब्‍यात

Sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क : संसदेच्‍या हिवाळी अधिवेशन सुरु असताना १३ डिसेंबर राेजी  काही तरुणांनी लोकसभेत घुसखोरी  करत 'तानाशाही नहीं चलेगी, लोकतंत्र बचाओ, काला कानून खतम करो,' अशा घोषणा देत धुराचे नळकांडे फोडले. संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला बुधवारी 22 वर्षे पूर्ण होत असताना, नव्या संसद भवनाच्या सुरक्षेला खिंडार पाडणार्‍या या घटनाक्रमामुळे सरकारसह सुरक्षा यंत्रणांची एकच तारांबळ उडाली. या प्रकरणी आणखी दाेघांना चौकशीसाठी  ताब्यात घेतले आहे. (Parliament breach case) यातील एक जण  कर्नाटकमधील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. अतुल कुलश्रेष्‍ठ आणि साई कृष्‍णा अशी ताब्‍यात घेतलेल्‍या संशयितांची नावे आहेत.

निवृत्त पोलीस उपअधीक्षकांचा मुलगा

माहितीनुसार, संसद घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी बुधवारी (दि.२१) रात्री आणखी एकाला अटक केली आहे.  साई कृष्णा असे त्‍याचे नाव आहे. ताे कर्नाटकचे निवृत्त पोलीस उपअधीक्षक यांचा मुलगा आहे. लोकसभेच्या सभागृहात १३ डिसेंबर रोजी प्रवेश करत डब्यातून पिवळा वायू सोडला होता. या घुसखोरांपैकी एक असलेल्य़ा मनोरंजन डीचा मित्र आहे. साई कृष्णा आणि मनोरंजन बेंगळुरूच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात वर्गमित्र होते. दिल्ली पोलिसांनी बुधवारी (दि.२०) रात्री 10 वाजता  बागलकोट (कर्नाटक) येथील घरातून ताब्यात घेतले. त्याला चौकशीसाठी दिल्लीत आणले जात आहे.

साईकृष्णाने काहीही चूक केली नाही

 अभियंता असलेला साईकृष्ण हा बागलकोट येथील त्यांच्या घरातून काम करत होते. त्याची बहीण स्पंदाने प्रसारमाध्यमांना सांगितले की, तिच्या भावाने कोणतीही चूक केली नाही. दिल्ली पोलिसांनी त्याच्या भावाची चौकशी केली हे खरे आहे, त्याने पोलिसांना यात पूर्ण सहकार्य केले, असे ते म्हणाले. साईकृष्णाने काहीही चूक केलेली नाही. तो आणि मनोरंजन रूममेट होते पण आता त्याचा भाऊ घरून काम करतो.

 भगतसिंग यांच्या विचारांचा अतुलवर प्रभाव

दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आणखी एका व्यक्तीचे नाव अतुल कुलश्रेष्ठ असे असून तो उत्तर प्रदेशातील जालौनचा आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की अतुल, ज्याला 'बच्चा' म्हणूनही ओळखले जाते, त्याची कोणत्याही स्वरुपाची  गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे तसेच कोणताही राजकीय संबंध नाही. परंतु तो विद्यार्थी जीवनापासूनच शहीद भगतसिंग यांच्या विचारसरणीने प्रभावीत आहे. तो फेसबुकवर संसदेतील घुसखोरांशी रेकॉर्ड चॅट सापडले आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्याला चौकशीसाठी अटक केली आहे. अतुल हा भगतसिंग संबधित काही गटांशी जोडलेल्या सभांचे आयोजन करायचा त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आंदोलनातही सहभागी झाला होता. अतुलच्या कुटूंबियांशी माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी  प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अतुलला दोन मुले आणि एक मुलगी आहे.

Parliament breach case : घुसखोरांनी सांगितला हाेता उद्देश…

१३ डिसेंबर रोजी संसदेतील सुरक्षा भंग केल्याप्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये लोकसभेत घुसखोरी करणारे मनोरंजन आणि सागर शर्मा, संसदेबाहेर धुराचे डबे वापरणारे अमोल शिंदे आणि नीलम आझाद यांचा समावेश आहे. ललित झा, सुरक्षा भंगाचा मास्टरमाईंड मानला जातो आणि महेश कुमावत, ज्याने झा यांना मदत केल्याचा आरोप आहे. घुसखोरांनी पोलिसांना सांगितले की त्यांचा उद्देश मणिपूर अशांतता, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधणे हा होता. पोलिसांनी मात्र सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT