Latest

Parineeti-Raghav Wedding Date: परिणीती चोप्रा- राघव चढ्ढा यांच्या लग्नाची तारीख ठरली

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चढ्ढा यांचा साखरपुडा झाला आहे. त्यापासून चाहते त्यांच्या लग्नाची (Parineeti-Raghav Wedding Date) आतुरतेने वाट पाहत आहेत. आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे २५ सप्टेंबररोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. परिणीती आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा १३ मे २०२३ रोजी दिल्लीत झाला होता. आता पुढील महिन्यात ते दोघे सात फेरे घेतील.

दरम्यान, लग्नाच्या तारखेबाबत (Parineeti-Raghav Wedding Date) कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिणीतीच्या टीमने लग्नाची तयारी सुरू केली आहे. तथापि, मीडिया रिपोर्ट्स असा दावा करत आहेत की, परिणीती चोप्रा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तिच्या लग्नाची तयारी सुरू करेल. हे लग्न राजस्थानमध्ये होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर गुरुग्राममध्ये रिसेप्शन होणार आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर परिणीती सध्या 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात ती अभिनेता अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. परिणीती आणि राघव चढ्ढा दोघेही जुने मित्र आहेत. २०२२ पासून त्यांच्यामध्ये जवळीक वाढून ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

परिणीती चोप्रा पंजाबमध्ये 'चमकिला' चित्रपटाचे शूटिंग करत होती. त्यावेळी राघव चढ्ढा परिणीतीला भेटण्यासाठी चित्रपटाच्या सेटवर पोहोचला होता. तेव्हाच दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि मग दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

बहीण प्रियांका चोप्राप्रमाणेच परिणीतीही शाही पद्धतीने लग्न करणार असल्याची चर्चा आहे. कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त, खास मित्र आणि बॉलिवूड इंडस्ट्रीपासून राजकारणापर्यंतचे लोक लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT