Latest

पूर्णा : एवढंच बाकी होतं… चोरट्यांनी पळवला भलामोठा जेसीबी

निलेश पोतदार

पूर्णा ; पुढारी वृत्‍तसेवा पूर्णा तालुक्यातील आडगाव लासीना येथील शेतकरी अंबादास देवराव भोरे यांची ३ डि एक्स गुजरात कंपनीची २५ लाख रुपये किंमतीची जेसीबी मशीन चोरीला गेल्‍याचा प्रकार समोर आला आहे. वसमतच्या ईंजन गाव येथील शेती अखाड्यावरुन ३ मार्च रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी जेसीबी मशीन पळवले आहे. मात्र त्यामुळे जेसीबी मालकाने भाड्याने हवाली केलेल्या एका गुत्तेदाराची चांगलीच भंबेरी उडाली आहे. घटनेची तक्रार वसमत ग्रामीण पोलीसात दिली असून या घटनेचा अधिक तपास चालू आहे.

या विषयी सविस्तर वृत्त असे की, पूर्णा तालुक्याच्या आडगाव लासीना येथील शेतकरी अंबादास देवराव भोरे यांनी सन २०१८ साली आपल्या शेतीपीक उत्पन्नाच्या पैशातून ३ डि एक्स क्रमांक एम एच २२ ए एम १४४८ ही जेसीबी मशीन ३५ लाख रुपयास विकत घेतली होती. त्यानंतर त्यांनी ही जेसीबी शेतातील नाला काढणे व ईतर खोदकामासाठी परराज्यातील मिथलेसकूमार बिहारी नावाचा ऑपरेटर चालक महिन्यावारीने लावून व्यवसाय केला. त्यानंतर पूर्णेच्या एकरुखा येथील एका गुत्तेदारास तिन महिन्यासाठी तासीका बेसेसवर महावारी पध्दतीने जेसीबी भाड्याने देवून हवाली केला होता. त्या कामाचे गुत्तेदाराकडे ५ लाख रुपये भाडेही जेसीबी मालकाचे येणेबाकी असताना सदर गुत्तेदाराने ही जेसीबी वसमतच्या ईंजन गाव येथील शेतरस्ता गावरस्त्याच्या कामाला गुत्तेदाराच्या हवाली असताना ३ मार्च २०२४ रोजी‌ रात्री काम बंद केल्यावर सदरील जेसीबी ईंजनगाव येथील शेतकरी प्रेरश रमेश आगलावे, नारायण बळीराम अडकिणे बटाऊदार यांच्या आखाड्यावर आणून लावली. तेथे देगाव पूर्णा येथील संजय ईंगोले यांनीही आपली जेसीबी मशीन उभी केली व संजय ईंगोले आणि भोरे यांच्या जेसीबीचा आपरेटर मिथलेशकुमार बिहारी हे दोघेजण तेथून वापस येवून बिहारी यास आडगाव येथील आखड्यावर मुक्कामी सोडले.

दुसऱ्या दिवशी ४ तारखेस भोरे यांचा मुलगा व आपरेटर ईंजनगाव येथे अखाड्यावर गेले असता सदर जेसीबी गायब झाल्याचे निर्दशनास आले. या घटनेची पोलीसात तक्रार देवून भोरे यांनी स्वत: शिरडशाहपूर फाटा रोड कॉर्नर व औंढ्याजवळील नॅशनल धाबा येथे सिसिटीव्ही फुटेज तपासले असता जेसीबी मशीन पळवुन नेताना दिसली. नॅशनल धाबा फाटा येथून जेसीबी जिंतूर रोडने वळवल्याचे समजते. तसे अनेक सिसिटीव्ही फुटेज उघड झाले आहेत. या प्रकरणी सबंधित पोलिस ठाण्याच्या तपास अधिका-यांकडून म्हणावे तसे गांभीर्य घेतले जात नसल्याने चोरी होवून चार दिवस उलटून जात असतानाही जहाजा सारख्या मोठ्या अवजड जेसीबीचा शोध लागू नये ही खेदाची बाब असल्याचे व ज्या गुत्तेदारास जेसीबी भाड्याने दिली होती त्याच गुत्तेदाराने जेसीबी ची विल्हेवाट लावली असल्याची तक्रार जेसीबी मालक अंबादास देवराव भोरे यांनी पोलीसात दिली आहे..परंतू यात खरेखोटे काय आहे? हे पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

दरम्यान,तक्रारीवरुन वसमत ग्रामीणचे सपोनी काचमांडे यांनी गस्ती संदेश काढून ३ डि एक्स कंपनीची जेसीबी आरटीओ पासिंग क्रमांक एम एच २२ ए एम १४४८ च्या समोरील काचावर भोरे पाटील अर्थमुव्हर्स लिहलेले असून, समोरील बोनेट चेंबलेले आहे. अशा वर्णनाची ३ डि एक्स कंपनीची जेसीबी शोध घेवून मिळून आल्यास सपोनि काचमांडे ८३२९७९४२७३ व पोउपनि यामावार ९०९६६१२३७०,पोह ए आर राठोड ९९२३८०००१९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे अवाहन करण्यात आले आहे. आजवर मोटारसायकल, ट्रक्टर ट्राल्या, कार या वाहनाच्या चो-या होत आल्या आहेत. त्या होतही आहेत. परंतु जेसीबी मशीन चोरीला जाणे ही महाराष्ट्र राज्यातील पहिलीच घटना असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.

सदरील जेसीबी चोरी प्रकरणी जेसीबी मालक अंबादास देवराव भोरे यांच्या तक्रारीवरून जेसीबी तासिका बेसवर घंटेवारी भाड्याने हवाली केलेले गुत्तेदार तांबे यांनीच सदर जेसीबीची विल्हेवाट लावली असी गुत्तेदारा विरुध्द अर्ज दिला आहे. सदर गुत्तेदारास ठाण्यात बोलावून चौकशी केली असता, आम्ही जेसीबीची विल्हेवाट लावली नाही. आमच्या भावकीतले लग्न असल्यामुळे जेसीबीकडे कामावर गेलो नव्हतो. रात्री कोण्या अज्ञात चोराने नेली ते माहित नाही असे सांगितले. तरीही आमच्या पध्दतीने जेसीबीचा शोध चालू आहे. घटनास्थळावरुन जिंतूरपर्यंत जेसीबी पळवुन नेल्याचे सिसिटीव्ही फुटेज मिळाले आहे. यानंतर मंगळवार, बुधवारपर्यंत चौकशी तपासानूसार तक्रारीप्रमाणे गुत्तेदारा विरुध्द गुन्हा नोंद होईल. असी माहीती सबंधित पोलीस ठाण्यातील पोलिस तपास सुत्रांनी दिली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT