Latest

परभणी: उद्धव ठाकरेंना राखी बांधून सखुबाई लटपटेंनी जपली ३० वर्षांची परंपरा

अविनाश सुतार

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : परभणी जिल्ह्याच्या शिवसेनेत 'रणरागिनी' असा विशेष उल्लेख असलेल्या गंगाखेड तालुक्याच्या सुपुत्री तथा शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटिका सखुबाई लटपटे यांनी बुधवारी (दि.३०) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर जाऊन राखी बांधली. आणि ३० वर्षांची अखंड परंपरा कायम ठेवली. (Sakhubai Latpete)

शिवसेनेच्या जडणघडणीत मागील अनेक वर्षांपासून गंगाखेड तालुक्याच्या रहिवासी सखुबाई लटपटे यांचे महिला संघटनात मोठे योगदान आहे. परभणी जिल्हा महिला संघटिका म्हणून पक्ष कार्य करीत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत मातोश्रीच्या आदेशाचे सातत्याने पालन करत महिला संघटनात सखुबाई लटपटे यांचे अग्रस्थान राहिले आहे. राखी पौर्णिमेचे औचित्य साधून उद्धव ठाकरे यांना कोरोना काळातील अपवाद वगळता दरवर्षी त्या रक्षाबंधनासाठी मातोश्रीवर पोहोचतात. त्याच परंपरेला जपत आज सखुबाई लटपटे यांनी उद्धव ठाकरे यांना रक्षाबंधनाचा धागा बांधून मातोश्रीवरील आपले नाते जपण्याची परंपरा कायम ठेवली.

'मातोश्री'साठी जीव हाजीर: सखुबाई लटपटे (Sakhubai Latpete)

मातोश्रीच्या सुख-दुःखात आपण अनेक वर्षांचे साक्षीदार आहोत. या अगोदरही व यानंतरही मातोश्रीसाठी आपला जीव हाजीर असल्याच्या भावनिक प्रतिक्रिया 'पुढारी'शी बोलताना सखुबाई लटपटे यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT