Latest

Paras Mhambrey World Cup 2023 : भारतीय गोलंदाजांच्या यशामागे ‘या’ मुंबईकर गुरुचे मार्गदर्शन; जाणून घ्या कोण आहे दिग्गज

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषकात सर्वांत प्रथम भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये धडक मारली. भारताच्या यशामागे विराट कोहली, रोहित शर्मा शुभमन गिल यांच्या फलंदाजीचा जेवढा वाटा आहे. तेवढाच वाटा भारतीय गोलंदाजीचा आहे. भारतीय गोलंदाजांनी या विश्वचषकात आक्रमक, उत्कृष्ट गोलंदाजी करत अनेक दिमाखदार विजय मिळवले आहेत. भारताच्या आक्रमक आणि यशस्वी गोलंदाजीमध्ये मुंबईकर प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी विशेष योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे. (Paras Mhambrey World Cup 2023)

खासकरून मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीने टीम इंडियाला अनेक सामन्यात विजयी आघाडी मिळवून दिले. एकेकाळी टीम इंडिया चांगल्या फलंदाजीच्या जोरावर विजय मिळवत असे. भारताकडे सध्याला आहेत, असे आक्रमक आणि विकेटटेकर गोलंदाज नव्हते. दरम्यान, भारताच्या सध्याच्या गोलंदाजीमध्ये सुधारणा करण्यात प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांचे योगदान आहे. (Paras Mhambrey World Cup 2023)

कोण आहेत पारस म्हांब्रे? (Paras Mhambrey World Cup 2023)

भारताचे गोलंदाजी प्रशिक्षत पारस म्हाब्रे यांनी १९९६ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात आंतरराषट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या दौऱ्यावर सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि व्यंकटेश प्रसाद यांनी कसोटीतील पहिला सामना खेळला होता. मात्र, इतर खेळाडूंप्रमाणे त्याला स्वत:चा प्रभाव निर्माण करता आला नाही. (Paras Mhambrey World Cup 2023)

त्याचे देशांतर्गत रेकॉर्ड प्रभावी होते. त्याने 1993-94 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये प्रत्येकी 23.77 दराने 30 विकेट्ससह पदार्पण केले होते. पुढील हंगामात भारत अ संघात स्थान मिळवले होते. म्हांब्रेची गोलंदाजीसह सातत्यपूर्ण कामगिरी – प्रत्येकी 24.36 दराने 284 विकेट पटकावल्या. त्यानंतर म्हाम्ब्रेने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमधून स्तर 3 कोचिंग डिप्लोमा पूर्ण केला. दोन हंगामांनंतर महाराष्ट्राचे प्रशिक्षक म्हणून त्याने बंगालची जबाबदारी स्वीकारली, ज्यांच्या नेतृत्वाखाली त्याने प्रत्येक दोन हंगामात रणजी फायनल गाठली. सप्टेंबर 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी त्याची भारत अ प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. (Paras Mhambrey World Cup 2023)

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT