Latest

Parabhani News : परभणीच्या सेफ्टी टॅंक दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची मदत

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनपेठ (जि. परभणी) शहराजवळील गंगाखेड रोडजवळील भाऊचा तांडा शिवारातील आखाड्यावर असलेल्या सेफ्टी टॅंकची सफाई करताना ५ कामगांराचा मृत्यू झाला. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. ११) रात्री आठ ते नऊ च्या सुमारास घडली. दरम्यान, मयत पाचही जण एकाच कुटुंबातील आहेत. या घटनेतील मृतांना प्रत्येकी १० लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजनेतून घोषीत केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. वाचा सविस्तर माहिती. (Parabhani News)

Parabhani News : प्रत्येकी १० लाख मदत

सोनपेठ (जि. परभणी) शहराजवळील भाऊचा तांडा येथे काल सेप्टिक टॅंकमधील मैला स्वच्छ करतांना पाच जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील जखमी झालेल्या कामगारावर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार शासनाच्या खर्चातून करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आज दिले.

गुरुवारी, रात्री ९ वाजेच्या सुमारास भाऊचा तांडा येथील शेत वस्तीवरील एका घरातील सेप्टिक टॅंकमधील मैला सफाई करताना पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता. एका कामगारास गंभीर अवस्थेमध्ये अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

घटनेतील मृतांची नावे

सोनपेठ (जि. परभणी) शहराजवळ झालेल्या घटनेत शेख सादेक (४५), शेख शाहरुख (२०), शेख जुनेद (२९), शेख नवीद (२५), शेख फिरोज (१९) या पाच जणांचा मृत्यू झाला असून शेख साबेर (१८) जखमी झाला आहे.
हेही वाचा
SCROLL FOR NEXT