Latest

Pan Aadhaar Link Last Date : पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची संधी, अन्यथा दुप्पट दंड!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख ३० जून आहे. यापूर्वी त्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ निश्चित करण्यात आली होती, परंतु आधारशी पॅन लिंक करण्याची तारीख ५०० रुपयांच्या दंडासह ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानंतर ही तारीखही उलटून गेल्यास कोणत्याही पॅनकार्डधारकाने त्याचे आधार पॅनशी लिंक केले नाही, तर त्याला पॅन आधारशी लिंक करायला १००० रुपये दंड भरावा लागणार आहे. (Pan Aadhaar Link Last Date)

तुमचे पॅन कधी पर्यंत राहिल ॲक्टीव्ह

आयकर कायद्याच्या (Income Tax Act) कलम २३४ एच नुसार, ३१ मार्च २०२३ पर्यंत पॅनला आधारशी लिंक केल्यास १००० रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल. तथापि, तुमचे पॅन कार्ड एक वर्ष म्हणजे मार्च २०२३ पर्यंत काम करत राहील. यामुळे २०२२-२३ साठी आयटीआर भरण्याच्या आणि परतावा देण्याच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. (Pan Aadhaar Link Last Date)

कसा दंड भराल…

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने ३१ मार्च २०२२ नंतर आणि ३० जून २०२२ पूर्वी पॅन आधारशी जोडण्यासाठी ५०० रुपयांचा दंड निश्चित केला आहे. ३० जूननंतर, ही रक्कम दुप्पट केली जाईल आणि ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १००० रुपये दंड आकारला जाईल. दंडाची रक्कम न भरता कुणीही पॅन आधारशी लिंक करू शकणार नाही. (Pan Aadhaar Link Last Date)

तुम्ही तुमचे पॅन आधार क्रमांकाशी लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड बंद केले जाईल. यानंतर, पॅन कार्डधारक म्युच्युअल फंड, स्टॉक आणि बँक खाती सुरू करू शकणार नाहीत. याशिवाय तुम्ही तुमचे बंद पॅन कार्ड कागदपत्र म्हणून कुठेही वापरल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो. आयकर कायदा १९६१ च्या कलम २७२ बी अंतर्गत तुम्हाला १० हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. (Pan Aadhaar Link Last Date)

पॅनला आधार कसे लिंक कराल?

आयकर अधिकृत वेबसाइट www.incometax.gov.in वर लॉग इन करा
क्विक लिंक्स सेक्शनमध्ये जाऊन लिंक आधार वर क्लिक करा
तुमच्या स्क्रीनवर एक नवी विंडो खुली होईल
तुमचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक येथे टाका
'मी माझे आधार तपशील प्रमाणित करतो' (I validate my Aadhaar details) हा पर्याय निवडा.
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP प्राप्त होईल. ते भरा आणि नंतर 'Validate' वर क्लिक करा.
दंड भरल्यानंतर तुमचे पॅन आणि आधार लिंक केला जाईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT