Latest

Israel-Palestine Conflict : इस्रायलमधील भारतीयांना केंद्राचा सतर्क राहण्‍याचा सल्‍ला

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दहशतवादी संघटना हमासने केलेल्या हजारो रॉकेट हल्ल्यांनंतर इस्रायलमध्ये प्रचंड तणावाची परिस्‍थिती आहे. या हल्‍ल्‍यात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून ५०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. केंद्र सरकारने इस्रायलमधील भारतीयाना सतर्क राहण्‍याचा सल्‍ला दिला आहे. तसेच त्‍यांच्‍या हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. (Israel- Palestine Conflict)

इस्रायलमध्ये हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सडेतोड प्रत्‍युत्तर देण्‍याचा निर्धार केला आहे. दहशतवादी संघटना हमासने केलेल्‍या हल्‍ल्‍यात इस्रायलमधील 22 नागरिकांचा मृत्‍यू झाला आहे तर 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. (Israel- Palestine Conflict )

Israel- Palestine Conflict : आवश्यक असेल तर घराबाहेर जा

भारत सरकारच्या दूतावासाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्‍ये सर्व भारतीय नागरिकांनी सावध राहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना कोणत्याही महत्त्वाच्या कारणाशिवाय हिंसाचारग्रस्त भागात जाण्यास मनाई केली आहे. दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात हिंसाचाराच्या ठिकाणी जाणे टाळा, असे म्हटले आहे. स्थानिक प्राधिकरणांच्या मार्गदर्शक तत्त्वांकडे लक्ष देण्याची खात्री करा.

इस्रायली अधिकाऱ्यांच्या सुरक्षा सुचनांचे पालन करा

नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षा सुचनांचे पालन करण्याचे आवाहन करून, इस्रायलमधील सर्व भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याची आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याची विनंतीही दूतावासाने केली आहे.
आश्रयस्थान आणि बंकरमध्ये आश्रय घेण्याचा सल्ला देत, दूतावासाने सांगितले की, बॉम्ब आश्रयस्थानांच्या जवळ रहा. अतिरिक्त माहितीसाठी इस्रायली होम फ्रंट कमांडची वेबसाइट फॉलो करण्याचे देखील सुचवले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत लोक कोणाशी संपर्क साधू शकतात?

आपत्कालीन परिस्थितीत, हेल्पलाइन नंबर- +97235226748 किंवा ईमेल आयडी- cons1.telaviv@mea.gov.in वर दूतावासाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो. दूतावासातील कर्मचारी कोणत्याही मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी सदैव उपलब्ध असतील, अशी ग्‍वाही परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

हेही वाचा :   

SCROLL FOR NEXT