Latest

Pakistani On India : ‘भारतीय iPhone च्या तर पाकिस्तानी मोफत रेशनच्या रांगेत’; देशातील परिस्थितीवर पाकिस्तानी संतप्त

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Pakistani On India : भारतात स्वतः टिम कूक ने येऊन आय फोनचे दोन स्टोअर सुरू केले. त्यावेळी आय फोन खरेदी करण्यासाठी लागलेल्या रांगा पाहून ते भारावून गेले. त्यांनी ग्राहकांसोबत सेल्फी घेत आनंद साजरा केला. याच्या बातम्या आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानातून यावर प्रतिक्रिया आल्या आहेत. यावेळी पाकिस्तानी नागरिकांनी एकीकडे भारतीय नागरिक आयफोनच्या रांगेत उभे आहेत. तर पाकिस्तानचे नागरिक मोफत मिळणाऱ्या रेशनच्या रांगेत उभे राहायला मजबूर आहेत, अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत पाकिस्तानच्या परिस्थितीवर संताप व्यक्त केला.

Pakistani On India : वाचा पाकिस्तानी नागरिकांच्या सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

भारतात विदेशी गुंतवणूकदारांसाठी चांगले वातावरण आहे. याची अनेक पाकिस्तानी युजर्सने त्यांच्या ट्विटर हँडलवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात एका पाकिस्तानी ट्विटर युजरने लिहिले आहे, पाकिस्तानची भारताशी तुलना करण्याचे सोंग अखेर संपले आहे. भारताच्या तुलनेत आपण कुठेही उभे नाही. पाकिस्तानच्या नेत्यांनी केवळ संरक्षण बजेटच्या नावाखाली भारताविरुद्ध प्रचंड संपत्ती जमा केली आहे.

एका वापरकर्त्याने त्याच्याच देशाची खिल्ली उडवली की, "भारतीय लोक मुंबईत अॅपलचे पहिले स्टोअर सुरू झाल्याचा आनंद साजरा करत आहेत आणि पाकिस्तान आपल्या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची किंवा त्याच्या चलनाची, अगदी संस्थांचीही काळजी घेऊ शकत नाही."'

आणखी एका पाकिस्तानी यूजरने लिहिले की, 'एका बाजूला मुंबई आहे जिथे अॅपल स्टोअरच्या बाहेर शेकडो लोक रांगेत उभे आहेत, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे, जिथे शेकडो लोक मोफत रेशन घेण्यासाठी रांगेत उभे आहेत.'

Pakistani On India : विदेशी गुंतवणुकीबाबत पाकिस्तानात भारताच्या उलट स्थिती

एकीकडे भारतात विदेशी गुंतवणूकदारांसाठी चांगले वातावरण आहे. तर पाकिस्तानात याच्या एकदम उलटी परिस्थिती आहे. असे एका युजरने म्हटले आहे. अनेक देशांच्या राजदूतांनी त्यांचे तेथील दूतावास देखील बंद केले आहे. या पार्श्वभूमीवर काही पाकिस्तानी यूजर्सने चिनी नागरिकाला दिलेल्या वागणुकीबद्दल चर्चा केली आहे.

काही दिवसांपूर्वी (17 एप्रिल) पाकिस्तानमधील चायना गझौबा ग्रुप कंपनीचा अभियंता असलेल्या एका चिनी नागरिकावर पाकिस्तानमध्ये ईशनिंदेचा आरोप करण्यात आला होता आणि त्याला दोन आठवड्यांसाठी ताब्यात घेण्यात आले होते.

इस्लामाबादच्या उत्तरेस सुमारे 350 किमी अंतरावर असलेल्या दासू जलविद्युत प्रकल्पातील एका शिबिरात चिनी नागरिक तैनात होते. रमझानमध्ये नमाजासाठी लांबलचक ब्रेक आणि कामाचा वेग यावरून स्थानिक कर्मचाऱ्यांशी त्याचे जोरदार वाद झाले. या दरम्यान त्याने पैगंबराचा अपमान केल्याचे सांगण्यात आले आणि त्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यासाठी जमाव जमला. मात्र, काही वेळातच पोलीस तेथे पोहोचले आणि त्यांनी चिनी नागरिकाला ताब्यात घेतले, त्यामुळे प्रकरण शांत झाले.

स्वीडननेही सुरक्षेचे कारण देत इस्लामाबादमधील आपला दूतावास या महिन्यात बंद केला होता. दूतावासाने सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येत असल्याचे निवेदन जारी केले होते. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला आमचे प्रथम प्राधान्य असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT