Latest

Pakistan Team : पाकिस्तानचा सेमी फायनलमध्ये पोहचण्याचा मार्ग खडतर; जाणून घ्या समीकरण…

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात गुरुवारी पाकिस्तानचा (Pakistan Team) झिम्बाब्वेकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पाकिस्तानसाठी सेमी फायनलचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. असे त्यांचे मत आहे. पण हे दरवाजे पूर्णपणे बंद आहेत असही नाही. इथून पुढे पाकिस्तान स्वत:साठी सेमी फायनलचे दरवाजे कसे उघडू शकतो ते जाणून घेऊयात.

उर्वरीत सुपर १२ मधील उर्वरित तीन सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवावे लागेल. टीम बाबरला हॉलंड, बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिका या संघांविरूध्द सामने खेळावे लागणार आहेत. अंतिम चारमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी पाकिस्तानला या सर्व सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. पाकिस्तानला हे तिन्ही सामने फक्त जिंकून चालणार नाहीत तर ते चांगल्या नेट-रन रेटने जिंकावे लागतील. (Pakistan Team)

तसेच, भारताकडून आणि स्वत:कडून आफ्रिकेचा पराभव होणे पाकिस्तान दृष्टीने महत्वाचे आहे. तसेच झिंबाब्वेचा उर्वरीत तीन सामन्यात पराभव झाल्यास पाकिस्तानचा संघ सेमी फायनल पर्यंत पोहचू शकतो. झिंबाब्वे संघाला भारत, बांग्लादेश आणि हॉलंडविरूध्द सामने खेळावे लागणार आहेत. असे झाल्यास पाकिस्तानच्या सेमी फायनल खेळण्याच्या आशा पल्लवीत राहतील. (Pakistan Team)

एवढ्या सगळ्या समीकरणात पाकिस्तानला बांग्लादेशवर देखील अवलंबून रहावे लागणार आहे. बांग्लादेशने त्यांच्या उर्वरीत सामन्यांपैकी एका सामन्यात पराभूत होणे पाकिस्तानच्या दृष्टीने महत्वाचे आहे. एकूणच पाकिस्तानचा टी-२० विश्वचषकातील मार्ग अजिबात सोपा नाही.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT