Latest

Pakistan : कंगाल पाकिस्तानवर सौदी मेहरबान; इतके प्रचंड कर्ज देणार…

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : भीकेला लागलेल्या कंगाल पाकिस्तानला Pakistan आता आर्थिक सहाय्यता मिळणार आहे. आधीच 100 अब्ज डॉलर कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या पाकिस्तानला आता आणखी दोन अब्ज डॉलर कर्ज मिळणार आहे. त्यामुळे कंगाल पाकिस्तानकडे आता पैसे येणार आहे. पाकिस्तानवर ही मेहेरबानी सौदी अरब करणार आहे. सौदी अरबकडून पाकिस्तानला लवकरच 2 अब्ज डॉलर इतके प्रचंड कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Pakistan : सौदी सरकार 2 अब्ज डॉलर्सचे कर्ज देणार आहे

याविषयी माहिती देताना अर्थ राज्यमंत्री आयशा गौस यांनी पाकिस्तानी संसदेत सांगितले की, सौदी अरेबिया या बंधू राष्ट्राकडून त्यांना आर्थिक पॅकेज मिळणार आहे. असे म्हटले जाते की सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान (MBS) यांनी चार महिन्यांपूर्वी शेहबाज शरीफ यांना पाकिस्तानला 2 अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्याचे वचन दिले होते. तेव्हापासून पाकिस्तान सरकार त्या कर्जासाठी वारंवार विनंती करत होते. आता सौदी अरेबियानेही पाकिस्तानला २ अब्ज डॉलर्स देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Pakistan : IMF कडून देखील कर्जाच्या आशा

सौदीने कर्ज देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तान सरकारच्या आशा वाढल्या आहेत. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF देखील त्याला कर्जाचा हप्ता देईल, असे पाकिस्तानला वाटत आहे.

Pakistan : निवडणुकांच्या तोंडावर मिळणार पैसे

पाकिस्तानच्या पंजाब राज्यात सध्या निवडणुका होणार आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तानच्या केंद्र सरकारला निवडणूक खर्चासाठी आयोगाला पैसे उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. पंजाबच्या निवडणुकांसाठी तेथील निवडणूक आयोगाने पाकिस्तान सरकारकडे 21 अब्ज रुपये मागितले होते. न्यायालयाने 10 एप्रिलपर्यंत निवडणूक आयोगाला फंड उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते.

सूत्रांचा हवाला देत द न्यूज इंटरनॅशनलने सांगितले की, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाला (ECP) सोमवारपर्यंत कोट्यवधी रुपयांची रक्कम जारी केली जाऊ शकते. ईसीपीच्या प्रवक्त्याने सांगितले की त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत, परंतु त्यांना आशा आहे की लवकरच रक्कम मिळेल.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT