Latest

पाकिस्‍तानमध्‍ये निवडणुकीचे पडघम, पंतप्रधानपदावरुन शरीफ आज पायउतार होणार?

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : शेहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आज (दि.९) पाकिस्‍तानच्‍या पंतप्रधानदावरुन ( Pakistan Prime Minister) पायउतार होण्‍याची शक्‍यता आहे. संसदेच्‍या कनिष्‍ठ सभागृहाचा पाच वर्षांचा कार्यकाळ १२ ऑगस्‍ट रोजी संपुष्‍टात येत आहे. शेहबाज शरीफ त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळविण्यासाठी पाकिस्तानची नॅशनल असेंब्ली वेळेपूर्वी विसर्जित करण्याची शक्‍यता आहे, असे वृत्त 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'ने दिले आहे

Shehbaz Sharif : नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्‍याचा पंतप्रधान देणार सल्‍ला

शरीफ यांनी मंगळवारी रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्क मुख्यालयात लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची भेट घेतली. येथे त्‍यांनी आगामी निवडणुकासंदर्भात चर्चा  केल्‍याचे वृत्त 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'ने दिले आहे. इस्लामाबादमधील एका समारंभात पंतप्रधान शेहबाज शरीफ(Shehbaz Sharif)  म्हणाले की, "उद्या आमच्या सरकारचा कार्यकाळ पूर्ण हाेत आहे. मी नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याचा सल्ला राष्ट्रपतींना पत्राव्‍दारे देईन." दरम्‍यान, राष्ट्रपती अल्वी ताबडतोब अधिसूचना जारी करण्यास नका दिला तरी देशातील कायद्‍यानुसार ४८ तासांच्‍या आत नॅशनल असेंब्ली विसर्जित केली जाण्‍याची शक्‍यता आहे.

जनगणनेमुळे निवडणूका लांबणीवर पडण्‍याची शक्‍यता

पाकिस्‍तान संसद कार्यकाळ संपल्‍यानंतर निवडणूक आयोग ६० दिवसांच्‍या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे. मात्र हा कालावधी अपूरा आहे. नुकतेच देशात नवीन जगणनेला मान्‍यता देण्‍यात आली आहे. त्‍यामुळे निवडणूक आयोग आता १२० दिवसांच्‍या आत निवडणूक प्रक्रिया सुरु करु शकते. त्‍यामुळे पाकिस्‍तानमधील निवडणूका काही महिने लांबणीवर पडतील, अशी शक्‍यता गृहमंत्री राणा सनाउल्लाह मंगळवारी जिओ न्यूजशी बोलताना व्‍यक्‍त केली.

शेहबाज शरीफ यांनी राजीनामा दिल्‍यानंतर काळजीवाहू पंतप्रधान म्‍हणून काही नावांची चर्चा सुरु आहे. घटनात्मकदृष्ट्या, काळजीवाहू सहमत होईपर्यंत शेहबाज शरीफ हेच काळजीवाहू पंतप्रधान म्‍हणून काम पाहितील.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT