Latest

ICC ODI Rankings : वनडे रॅकिंगमध्‍ये पाकिस्‍तानची सरशी, भारत पाचव्‍या स्‍थानी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) वनडे रँकिंग जाहीर केले आहे. सलग दोन मालिकांमधील विजयांमुळे पाकिस्‍तानचा संघाची रँकिंगमध्‍ये सरशी झाले आहे. पाकिस्‍तानच्‍या संघाने नुकतीच वेस्‍ट इंडिय मालिकेत विजय मिळवला. यामुळे पाकिस्‍तानच्‍या संघाने आयसीसी वनडे रँकिंगमध्‍ये चौथे स्‍थान पटकावले आहे. भारतीय संघाने मागील काही महिने वनडे मालिकाच खेळलेली नाही. त्‍यामुळे भारतीय संघ वनडे रँकिंगमध्‍ये पाचव्‍या स्‍थानावर पोहचला आहे.

'आयसीसी'च्‍या ताज्‍या वनडे रँकिंगनुसार न्‍यूझीलंडचा संघ पहिल्‍या स्‍थानावर आहे. तर विश्‍वविजेता इंग्‍लंड संघ हा दुसरा तर ऑस्‍ट्रेलिया तिसर्‍या स्‍थानावर आहे. भारत हा चौथ्‍या क्रमांकावर होता. मात्र पाकिस्‍तानच्‍या संघाने वेस्‍ट इंडिज विरुद्‍धची मालिका ३-० अशी जिंकली. त्‍यामुळे आता पाकिस्‍तान चौथ्‍या स्‍थानावर तर भारत पाचव्‍या स्‍थानावर गेला आहे.

वनडे रँकिंगमध्‍ये दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका, वेस्‍टइंडिज हे अनुक्रमे सहावा, सातवा, आठव्‍या आणि नवव्‍या
स्‍थानावर आहे. शेवटच्‍या दहाव्‍या स्‍थानावर अफगाणिस्‍तानचा संघ आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT