Latest

Pakistan Cricket Board : पीसीबीचा शाहिद आफ्रिदीला दणका, निवड समितीतून उचलबांगडी

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजाम सेठी यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नवीन निवड समिती प्रमुखाची सोमवारी घोषणा केली. रमीज राजा यांच्यानंतर सेठी यांनी पीसीबीचा कारभार हाती घेतला. त्यानंतर त्यांनी माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची प्रभारी निवड समिती प्रमुख म्हणून निवड केली होती. (Pakistan Cricket Board)

आफ्रिदीकडेच ही जबाबदारी कायम ठेवली जाईल अशी चर्चा होती; परंतु आज सेठी यांनी पत्रकार परिषद घेऊन हारुण रशीद हे नवीन निवड समिती प्रमुख असल्याचे जाहीर केले. पाकिस्तानकडून 13 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 1383 धावा करणार्‍या रशीदकडे ही जबाबदारी सोपवल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Pakistan Cricket Board)

यावेळी 4 फेब्रुवारीला आशियाई क्रिकेट परिषदेच्या होणार्‍या बैठकीत आशिया चषक स्पर्धेबाबत जोरदार भूमिका मांडणार असल्याचे सेठी यांनी स्पष्ट केले. हारुण रशीद यांनी या नियुक्तीनंतर पीसीबीच्या मॅनेजमेंट समितीतून राजीनामा दिला आहे. दरम्यान, शाहिद आफ्रिदीने पीसीबीने निवड समितीच्या प्रमुखपदावर कायम राहण्याची विनंती केल्याचा दावा केला आहे. पण, वैयक्तिक कारणास्तव आपण ही जबाबदारी स्वीकारली नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. (Pakistan Cricket Board)

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT