Latest

Pak vs Eng 1st Test : पाकिस्तानचे इंग्लंडसमोर ‘लोटांगण’; पहिल्या कसोटीत इंग्लंडचा ७४ धावांनी विजय

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानच्या रावळपिंडी मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर दिमाखदार विजय मिळवला. इंग्लंडने पाकिस्‍तानचा ७४ धावांनी धुव्वा उडवला. दुसर्‍या डावात जेम्स अँडरसन आणि ओली रॉबिनसन यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेत  इंग्लंडच्‍या विजयामध्‍ये बहुमूल्‍या योगदान दिले.  (Pak vs Eng 1st Test)

पहिल्‍या डावात दोन्‍ही संघांकडून दमदार फलंदाजीचे प्रदर्शन

पहिल्‍या कसोटी सामन्यात इंग्लडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सार्थ ठरवत इंग्लंडने पहिल्या डावात तब्‍बल ६५७ धावांचा डोंगर रचला. याच्या प्रत्युतरात पाकिस्तानच्या संघाने त्यांच्या पहिल्या डावात ५७९ धावा केल्या. पहिल्या डावात इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्रॅफे आणि डकेट यांनी शतक झळकवत धावांचा डोंगर उभा केला. इंग्‍लंड प्रत्‍युत्तर देण्‍यासाठी मैदानात उतरलेल्‍या पाकिस्तानकडून इमाम उल हक आणि शफिक या सलामीवीरांनी शतक झळकवले. पाकिस्‍तानच्‍या सलामीवीरांनी झळकवलेल्या शतकांच्या जोरावर इंग्लंडने मिळवलेली आघाडी कमी करता आली. (Pak vs Eng 1st Test)

पाकिस्‍तानसमोर दुसर्‍या डावात होते ३४२ धावांचे आव्‍हान

पहिल्या डावाच्या खेळानंतर इंग्लंडला ७८ धावांची आघाडी मिळाली. यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डाव सात बाद २६४ धावा केल्‍यानंतर डाव घोषित केला. दुसऱ्या डावात इंग्लंडकडून जो रूटने ६९ चेंडूमध्ये ७३ धावांची तर हॅरी ब्रुकने ६५ चेंडूमध्ये ८७ धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या नशीम शाह, मोहम्मद अली आणि जाहिद महमूद यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या. पाकिस्तानसमोर विजयासाठी ३४२ धावांचे आव्हान होते. (Pak vs Eng 1st Test)

दुसऱ्या डावात पाकिस्तानकडून साऊद शकिलने १५९ चेंडूमध्ये ७६, इमाम उल हक ने ७७ चेंडूमध्ये ४८ धावा करत पाकिस्तानला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला.  (Pak vs Eng 1st Test) पाकिस्तान संघ २६८ धावांपर्यंतच मजल मारु शकला.इंग्लंडने पाकिस्तानचा ७४ धावांनी धुव्वा उडवत मालिकेतील पहिला सामना आपल्या नावावर केला.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT