Latest

PAK vs AUS : पाकविरुद्धच्या वनडे सीरीजपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका!, ‘हा’ गोलंदाज जखमी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर तीन वनडे सामन्यांची मालिका आणि एक टी-20 सामना खेळायचा आहे (PAK vs AUS). ऑस्ट्रेलियाने काही दिवसांपूर्वी वनडे मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला होता पण आता संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दौऱ्यातून बाहेर पडला आहे. रिचर्डसनच्या जागी न्यू साउथ वेल्सचा वेगवान गोलंदाज बेन द्वारशुईसचा समावेश करण्यात आला आहे.

रिचर्डसन पाकिस्तानला रवाना होण्यापूर्वी मेलबर्नमध्ये तयारीमध्ये व्यस्त होता आणि याच दरम्यान तो जखमी झाला. त्यातच वनडे मालिकेसाठी मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड या त्रिकुटाला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या वेगवान आक्रमणाची जबाबदारी नवख्या गोलंदाजांच्या खांद्यावर असेल. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी फळीमध्ये जेसन बेहरेनडॉर्फ आहे, ज्याने फक्त ११ सामने खेळले आहेत. शॉन अॅबॉटने दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत, तर द्वारशुईस आणि नॅथन एलिस यांनी अद्याप पदार्पण केलेले नाही. कॅमेरून ग्रीन, मिचेल मार्श आणि मार्कस स्टॉइनिस या अष्टपैलू खेळाडूंच्या रूपात ऑस्ट्रेलियाकडे तीन चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्यामुळेच संघाला जास्त काही अडचणींचा सामना करावा लागणार नाही अशी शक्यता आहे. (PAK vs AUS)

दुसरीकडे, संघाचा कर्णधार अॅरॉन फिंचला नवख्या गोलंदाजांवर विश्वास आहे. तो म्हणाला, गोलंदाजी फळीतील प्रत्येकाने बरेच टी २० सामने खेळले असून त्यांचा हा अनुभव खूपच उपयुक्त ठरेल. नवीन खेळाडूंमध्ये भरपूर क्षमता आहे आणि त्यांनी देशांतर्गत स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये वनडे सामने खेळले आहेत. त्यामुळे आमचा संघ प्रतिस्पर्धी संघ पाकिस्तानविरुद्ध चांगले प्रदर्शन करेल असा विश्वास फिंचने व्यक्त केला आहे. (PAK vs AUS)

ऑस्ट्रेलियाचा वनडे संघ पुढील प्रमाणे

अॅरॉन फिंच (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅश्टन ॲगर, जेसन बेहरेनडॉर्फ, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, बेन मॅकडर्मॉट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, अॅडम झाम्पा, बेन ड्वार्स, बेन डवर्स. (PAK vs AUS)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT