Latest

अफगाणिस्ताकडून पुन्हा मोठा उलटफेर अन् इरफान-राशीदचा मैदानावर तुफान डान्स (Video)

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानने पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' करून वनडे विश्वचषकातील दुस-या सनसनाटी विजयाची नोंद केली. यंदाच्या विश्वचषकातला हा तिसरा उलटफेर ठरला आहे. बंगळूरच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकने अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 283 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे अफगाण संघाने आपल्या चिवट फलंदाजीच्या जोरावर पार केले आणि 8 विकेट्स राखून सामना खिशात घातला. दरम्यान, अफगाणिस्तानने पाकिस्तानवर विजय मिळवताच भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण आणि फिरकीपटू राशिद खानने मैदानावर तुफान डान्स केला. सामना संपल्यानंतर इरफान आणि राशिद खानने मैदानावर हा विजय सेलिब्रेट केला आहे.

इब्राहिम झद्रान (87 धावा), रहमानउल्ला गुरबाज (65), रहमत शाह (नाबाद 77), हशमतुल्ला शाहिदी (नाबाद 48) हे अफगाणिस्तानच्या या रोमहर्षक विजयाचे हिरो ठरले. या विजयासह अफगाणिस्तानने इतिहास रचला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सामन्यापूर्वी दोघांमध्ये 7 सामने खेळले गेले होते आणि सर्व सामन्यांत पाकने बाजी मारली होती. (PAK vs AFG)

अफगाणी सलामीवीरांची धमाकेदार सुरुवात (PAK vs AFG)

283 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अफगाणिस्तान संघाला सलामीवीर झद्रान आणि गुरबाज यांनी धमाकेदार सुरुवात केली. दोघांनी पाक गोलंदाजांवर एकापाठोपाठ आक्रमण चढवले. या दोघांनी पॉवरप्लेच्या 10 षटकांत 60 धावा केल्या. शाहीनच्या पहिल्याच षटकात 10 धावा वसूल केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात 8, तिसऱ्या- चौथ्या-पाचव्या आणि सहाव्या षटकात एकूण 16 जमा केल्या. सहाव्या षटकात पंचांनी झद्रानला बाद घोषित केले. अशा परिस्थितीत डीआरएसने त्याला वाचवले. जीवदान मिळाल्यानंतर आठव्या षटकात झद्रानने गुरबाजसह हरिस रौफच्या एका षटकात 17 धावा चोपल्या. या दोघांनी हरिसच्या एका षटकात चार चौकार मारले. हीच फटकेबाजीची लय दोघांनी काय ठेवली आणि पहिल्या विकेटसाठी 130 धावांची भागिदारी रचली.

अफगाणिस्तानची पहिली विकेट 130 धावांवर पडली. शाहीन आफ्रिदीने रहमानउल्ला गुरबाजला बाद केले. गुरबाजने 53 चेंडूत 65 धावा केल्या. ओसामा मीरने त्याचा झेल घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या रहमत शाहने आणि इब्राहिम झद्रानला खंबीर साथ दिली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचली. झद्रान त्याच्या शतकाच्या जवळ पोहचला होता पण 13 धावांनी त्याला हुलकावणी मिळाली. तो 87 धावांवर बाद झाला. 190 धावांवर अफगाणिस्तानची दुसरी विकेट पडली. हसन अलीने झद्रानला मोहम्मद रिझवानकरवी झेलबाद केले. (PAK vs AFG)

कर्णधार हशमतुल्लाह शहीदी मैदानात उतरला. त्याने शाह सोबत संयमी खेळी केली. ज्यामुळे अफगाणिस्तानच्या धावसंख्येने दोन गडी गमावून 200 धावा पार केल्या. दोघांनी चांगली भागीदारी करून संघाला हळूहळू लक्ष्याच्या जवळ नेले आणि आणि अखेर 49 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शहीदीने चौकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केला. (PAK vs AFG)

झद्रानच्या सर्वात जलद 1000 धावा (PAK vs AFG)

आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या झद्रानने या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या. तो अफगाणिस्तानसाठी सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला. डावातील तिसरी धाव घेत त्याने हा टप्पा गाठला. झद्रानला ही कामगिरी करण्यासाठी केवळ 24 डाव लागले. या बाबतीत त्याने आपला सहकारी गुरबाजला (27 डाव) मागे सोडले. (PAK vs AFG)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT