Latest

Padma Awards 2023 : ‘पद्मश्री’साठी फोन आला तेव्हाही ते दोघे पकडत होते साप…

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंधेला केंद्र सरकारकडून 'पद्म' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदा तामिळनाडू मधील साप पकडणाऱ्या दोघांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेले हे साप पकडणारे दोन्ही अवलिया तामिळनाडू मधील इरुला या आदिवासी जमातीतून येतात. मासी सदाइयान आणि वैदिवेल गोपाल अशी या दोघांची नावे आहेत. जेव्हा पुरस्कार घोषित झाल्याचा फोन या दोघांना आला तेव्हा हे दोघे साप पकडत होते. यांनी फोन उचलला आणि त्यांना सांगण्यात आले की तुम्हाला पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तेव्हा या दोघांनी एक मिनिट थांबत दिर्घ श्वास घेतला, एकमेकांकडे पाहिले आणि गालातल्या गालात हसत पुन्हा साप पकडण्याच्या मागे लागले. (Padma Awards 2023)

देशी तंत्राचा वापर करत पकडतात साप (Padma Awards 2023)

मासी सदाइयान आणि वैदिवेल गोपाल यांना वारशामध्ये आपल्या पुर्वजांकडून साप पकडण्याची कला प्राप्त झाली आहे. ते साप पकडण्यासाठी परंपरागत जुनी आणि देशी तंत्राचा वापर करत अत्यंत विषारी, घातक आणि भले मोठे साप लिलया पकडतात.

इरुलाचे आदिवासी साप पकडण्यात आहेत तरबेज

आदिवासी जमातीतील इरुला हे लोक तामिळनाडूच्या देनाकनिकोट्टईच्या जवळील जंगल परिसरात राहतात. त्यांना कन्नड भाषा सुद्धा चांगल्यापद्धतीने बोलता येते. हे लोक उंदीर आणि साप पकडण्यात अत्यंत कुशल आणि तरबेज आहेत.

अमेरिकेला घ्यावी लागली या दोघांची मदत

२०१७ मध्ये अमेरिका अजगरांच्या त्रासाने वैतागली होती. अमेरिकेतील जंगलातील बर्मन जातीचे अजगरे पकडण्यासाठी अमेरिकेने थेट मासी सदाइयान आणि वैदिवेल गोपाल या जोडीलाच साद घातली. तेव्हा ही साप पकडणारी जोडी प्रथम प्रकाशझोतात आली होती. अजगर पकडण्यासाठी या दोघांना अमेरिकेने ४४ लाख रुपये दिले होते.

अमेरिकेत पकडली २७ अजगरे

अजगर पकडण्यासाठी जेव्हा अमेरिकेने या दोघांनी बोलवले तेव्हा या दोघांनी तेथील जंगलात जात एक – दोन नव्हे तर तब्बल २७ अजगरे पकडली होती. यातील अनेक अजगरे ही अत्यंत दुर्मिळ प्रजातीतील होती.

दोघांची कला पाहून अमेरिकन अधिकारी सुद्धा झाले अवाक

वैदिवेल आणि मासी यांनी फक्त ८ दिवसातच अमेरिकेत १३ अजगर पकडण्याची किमया केली होती. दोघांनी १६ फूट लांब मादी अजगराला पकडून फ्लोरिडा फिश ॲन्ड वाईल्डलाईफ कंजर्वेशन कमिशनच्या अधिकाऱ्यांना अवाक करुन सोडले होते.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT