Latest

P. Chidambaram : काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांनी डोळ्यावर उपचार करावेत: पी. चिदंबरम

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर आरोप करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना डोळ्यावर उपचार करण्याचा सल्ला काँग्रेसने सोमवारी ( दि.६) दिला. संपत्ती कर आणि काँग्रेसचा जाहीरनामा यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते जोरदार टीका करत आहेत. त्यावर उत्तर देताना काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी डोळ्यांवर उपचार करण्याचा सल्ला भाजप नेत्यांना दिला. P. Chidambaram

देशात लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीमध्ये संपत्ती कराचे वितरण आणि काँग्रेसचा जाहीरनामा यावरुन जोरदार राजकारण आणि टीका-टिप्पणी होत आहे. यादरम्यान काँग्रेस जाहीरनामा समितीचे अध्यक्ष पी. चिदंबरम यांनी एक्सवर पोस्ट करुन भाजप नेत्यांना डोळ्यांवर उपचार करण्याचा सल्ला दिला. पी. चिदंबरम म्हणाले आहे की, "काँग्रेसच्या जाहीरनाम्यात संपत्तीच्या निर्मितीला, संपत्तीचे वितरण म्हणणाऱ्या नेत्यांनी एकतर पुन्हा माध्यमिक शिक्षण घ्यावे किंवा डोळ्यांच्या डॉक्टरांना भेटावे." P. Chidambaram

P. Chidambaram : १० वर्षात जीडीपी दुप्पट करण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ठ

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम म्हणाले की, "काँग्रेस सत्तेत आल्यास १० वर्षांत जीडीपी दुप्पट करण्याचे लक्ष आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून वस्तू आणि सेवांचे उत्पादन वाढवणाऱ्या धोरणांचे लक्ष ठेवले आहे. तसेच, मुक्त आणि निष्पक्ष व्यापारास प्रतिबंध करणारे नियम देखील बदलले जातील." काँग्रेस आता सत्तेत असते तर २०२३-२४ मध्ये देशाची अर्थव्यवस्था २०० लाख कोटींच्या पुढे गेली असती. असेही पी. चिदंबरम यांनी म्हणले आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT