Latest

ozone layer… ओझोनच्या स्तरातील छिद्र आकसतेय!

Arun Patil

वॉशिंग्टन : पृथ्वीवासीयांसाठी पर्यावरणाशी निगडीत एक 'गुड न्यूज' आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका रिपोर्टने सोमवारी पुष्टी केली की पृथ्वीचे सुरक्षा कवच असलेल्या ओझोनच्या स्तरातील (ozone layer) छिद्र आता आकसत चालले आहे. हे छिद्र 1980 च्या दशकापासूनच माणसाला भय दाखवत होते. आपल्या ग्रहाला, जीवसृष्टीला सूर्यप्रकाशातील घातक अतिनील किरणांपासून वाचवण्याचे कार्य ओझोनचा स्तर करीत असतो. त्यामधील या छिद्राने जगभरात चिंता निर्माण केली होती. 1975 आणि 1984 दरम्यान ब्रिटिश भूभौतिक वैज्ञानिक (जियोफिजिस्ट) जोसेफ फार्मन यांनी हवामानाचा अभ्यास करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या फुग्यांचा म्हणजेच वेदर बलून्सचा वापर करून याबाबतचे संशोधन केले होते.

त्यांनी दक्षिण ध्रुव 'अंटार्क्टिका'च्या हॅली बे सायंटिफिक बेसच्या वर वातावरणाच्या समताप मंडळात (स्ट्रॉटोस्फियर) मध्ये ओझोनच्या स्तरात एक हळूहळू वाढत जात असलेले छिद्र (ozone layer) पाहिले होते. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या मारियो मोलिना आणि शेरवूड रॉलँड यांच्या संशोधनात या छिद्राची माहिती मिळाली.

1974 मध्ये त्यांनी म्हटले होते की क्लोरोफ्लोरोकार्बन (सीएफसी) गॅस ओझोन स्तराला (ozone layer) विरळ बनवत आहे. या वायूचा वापर मोठ्या प्रमाणात रेफ्रिजेरेशन म्हणजेच शीतप्रक्रियेसाठी केला जातो. दोन्ही संशोधकांना या शोधासाठी 1995 मध्ये नोबेल पुरस्कारही मिळाला होता. मार्च 1985 मध्ये 28 देशांनी ओझोन स्तराच्या संरक्षणासाठी व्हिएन्ना करारावर स्वाक्षरी केली होती. या मुद्द्यावर हा पहिला आंतरराष्ट्रीय करार होता ज्याच्या माध्यमातून सदस्य देश ओझोन स्तराची हानी तसेच मानवी आरोग्य व पर्यावरणावरील त्याच्या प्रभावावर लक्ष ठेवण्यास कटिबद्ध होते.

व्हिएन्ना करारानंतर दोन वर्षांनी माँट्रियल प्रोटोकॉलचा मार्गही खुला झाला. त्यानुसार ओझोनच्या स्तराचे (ozone layer) क्षरण करणार्‍या पदार्थांचे उत्पादन आणि खप यांना मर्यादित ठेवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. दहा वर्षांच्या काळात सीएफसी आणि हॅलोन वायूंचा वापर निम्म्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले. असे सामूहिक प्रयत्न सुरू असूनही ओझोनमधील छिद्र हळूहळू वाढतच चालले होते. मात्र, आता 9 जानेवारी 2023 ला संयुक्त राष्ट्रांनी घोषणा केली की आता हे छिद्र पूर्णपणे भरून येण्याच्या मार्गावर आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT