Latest

Opposition leader’s meeting : विरोधक स्वतःच्या पोराबाळांच्या भविष्यासाठी एकत्र; चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना टोला

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : Opposition leader's meeting : एकीकडे पंतप्रधान अमेरिकेत जाऊन देशाची मान उंचावतात. मोदींना देशहिताची चिंता आहे. तर विरोधकांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता आहे, म्हणूनच पोराबाळांच्या भविष्यासाठी विरोधक एकत्र आले असल्याची टीका महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरवरून केली आहे. आज बिहारमधील पाटणा येथे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली १५ हून अधिक विरोधी पक्षांची महाबैठक होत आहे. या (Opposition leader's meeting) बैठकीवर सत्ताधाऱ्यांकडून सडकून टीका करण्यात येत आहे.

पुढे बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाबाहेर भारताची मान उंचावत असताना, दुसरीकडे विरोधक मात्र मोदीजींच्या विरोधात गळा काढण्यासाठी आज पाटण्यात एकत्र आले आहेत. पीएम मोदी यांना देशहिताची चिंता आहे, पण विरोधकांना स्वत:चे हित जपायचे होते. म्हणूनच विरोधक आपल्या पोराबाळांच्या भविष्यासाठी एकवटले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

२०२४ मध्येही जनता पंतप्रधान मोदींना साथ देईल-चंद्रशेखर बावनकुळे

काँग्रेसच्या सोनिया गांधी या राहुल गांधींना पंतप्रधान करू इच्छितात, शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांची चिंता आहे, तर उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंचं भविष्य दिसतंय. त्यामुळेच विरोधक एकवटले आहेत. पण देशातील जनता विरोधकांचा डाव ओळखून आहे. २०१९ ला जनतेनं पीएम मोदी यांच्यावर विश्वास टाकत आज एकवटलेल्या विरोधकांना घरात बसवलं. आता २०२४ मध्ये देखील जनता पंतप्रधान मोदी यांना साथ देईल, असा विश्वास देखील बावनकुळे यांनी ट्विटरवरून व्यक्त केला आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT