Latest

Manushi Chhillar : “ऑपरेशन व्हॅलेंटाईन”मध्ये मानुषी रडार ऑफिसरच्या भूमिकेत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सध्या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. याचं कारणदेखील तितकेच खास आहे. (Manushi Chhillar) शक्ती प्रताप सिंग हाडा दिग्दर्शित "ऑपरेशन व्हॅलेंटाईन" या आगामी एअरफोर्स चित्रपटात "रडार ऑफिसर" च्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसेल. नेहमीच अभिनयाच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांना मोहित केलं आणि आता या आगामी चित्रपटात ती ही कमालीची भूमिका साकारण्यासाठी सज्ज होत आहे. (Manushi Chhillar)

संबंधित बातम्या –

"ऑपरेशन व्हॅलेंटाईन" हा सिनेमा हवाई दलातील महान वीरांना मनापासून केलेला सॅल्युट आहे. रडार ऑफिसर म्हणून मानुषीची भूमिका बघणे उत्कंठावर्धक असणार आहे. अॅक्शन आणि इमोशन यांचा मिलाफ असलेला हा चित्रपट जगभरा प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही.

"ऑपरेशन व्हॅलेंटाईन" च्या रिलीजची सगळेच वाट बघत आहेत. मानुषी छिल्लरचे रुपेरी पडद्यावर ब्युटी क्वीनमधून अनोखं पदार्पण बघण्याजोगे असणार आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दोन दिवसांनी म्हणजे १६ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एकाच वेळी तेलुगू आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

SCROLL FOR NEXT