Latest

कराड : बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीचा मेव्हण्याने काढला काटा

निलेश पोतदार

बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीचा मेव्हण्याने काटा काढला. बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून चिडून येथील वाखाण परिसरात राहत असलेल्या मजूराचा त्याच्याच मेव्हण्याने गळा दाबून तसेच दगडाने ठेचून खून केला. गुरुवार दि. 28 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

नितीन नागेश भालशंकर (रा. वाखान परिसर, मूळ रा. बार्शी, जि. सोलापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर रवी रमेश कुडवे (रा. वाखाण परिसर, मूळ रा. बार्शी, जि. सोलापूर) असे खून प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील वाखाण परिसरात नितीन भालशंकर हा आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. तो दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ व मारहाण करायचा.

याच कारणावरून चिडून जाऊन नितीनच्या मेव्हण्याने दाजीचा गळा दाबून त्यानंतर त्याच्या छातीवर दगडाने ठेचून त्‍याचा खून केला.  घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी भेट दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चोरगे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT