Latest

सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात; ५ गाड्या एकमेकांवर आदळल्‍या, एक प्रवाशी ठार

मोनिका क्षीरसागर

पनवेल;पुढारी वृत्तसेवा: सायन-पनवेल महामार्गावर कामोठे उड्डाणपुलावर मुबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर आज सकाळी आठच्या सुमारास भीषण अपघात झाला. पाच गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये एका प्रवाश्याचा जागीच मृत्यू झाला, तर पाच ते सहा प्रवाशी जखमी झाले आहेत.

कामोठे उड्डाणपुलावर मुबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर सकाळी ट्रक बंद पडला होता. हा ट्रक दुरूस्त करण्याचे काम चालू होते. याचवेळी मागून भरधाव येणाऱ्या व्हॅगनार गाडी, इनोव्हा, एक ट्रक आणि एसटी महामंडळाची शिवनेरी बस, एकमेकांवर धडकल्या. त्यात व्हॅगनार मधील एकाचा जागीच मृत्यू झाला. व्हॅगनार गाडीतील इतर सहप्रवासी व इनोव्हामधील प्रवासी असे पाच ते सहा जण जखमी झालेले आहेत. या जखमींवर ती नजीकच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT