Latest

नांदेड : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, भोकरफाटा रस्त्यावर अपघात

अनुराधा कोरवी

अर्धापूर; पुढारी वृत्तसेवा : भोकरफाटा ते बारड रस्त्यावरील कलदगाव पाटीजवळ दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिली. या झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. ७) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव लक्ष्मण बळीराम सुर्यवंशी (वय ४६, रा. सुजलेगाव ) असे आहे.

संबंधित बातम्या 

याबाबत पोलिसंकडून मिळालेली माहिती अशी की, लक्ष्मण बळीराम सुर्यवंशी हे त्याच्या दुचाकीने (एमएच २६ बीएम ०६३२) उमरखेडला बुधवारी (ता. ६) सायंकाळी साडेपाच वाजता निघाले होते. त्यांची दुचाकी भोकरफाटा ते बारड रस्त्यावरील कलदगाव पाटीजवळ आली असता अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दुचाकीस्वार लक्ष्मणच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

या प्रकरणी मयताचा भाऊ विठ्ठल बळीराम सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कपील बुद्देवार हे करत आहेत.

SCROLL FOR NEXT