Latest

रावेरमध्ये रक्षा खडसेंच्या विरोधात श्रीराम पाटीलच, शरद पवार गटाकडून अधिकृत घोषणा

गणेश सोनवणे

जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे गेलेली होती. बऱ्याच दिवसांपासून अनेक उमेदवारांची नावे चर्चेत असतान शेवटी भाजपातून शरद पवार गटाकडे आलेले श्रीराम पाटील यांचे नाव आज अधिकृतरित्या जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्या रक्षा खडसे व शरद पवार गटाचे श्रीराम पाटील अशी लढत याठिकाणी पाहायला मिळणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज तिसरी उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात साताऱ्यातून शशिकांत शिंदे व रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपाने आपले जळगाव लोकसभेतील दोन्ही उमेदवार जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाकडून उमेदवारांची चाचणी करण्यात येत होती. अनेक इच्छुक त्या ठिकाणी रांगेत असताना शरद पवार गटाने भाजपाच्या जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना आपल्याकडून निवडणूक लढवण्यास तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नकार दिल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील व भाजपात नुकतेच गेलेले उद्योजक श्रीराम पाटील यांचे नाव चर्चेत होते. शेवटी उशिराने बारामती येथे झालेल्या बैठकीत श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी देण्यात आली होती. त्याची अधिकृत घोषणा शरद पवार गटाकडून आज झाली.

गेल्या अनेक दिवसांपासून रावेर लोकसभेमध्ये आपला संपर्क पाटील यांनी वाढवलेला होता. त्यांनी आपल्या उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्रीराम पाटील यांनी रक्षा खडसे यांच्या समोर एक कडवे आव्हान निर्माण केलेले आहे. लेवा पाटील विरुद्ध मराठा पाटील अशी ही लढत होणार आहे.

SCROLL FOR NEXT