Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा ः काँग्रेस | पुढारी

Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा ः काँग्रेस

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे वनमंत्री व भाजपाचे चंद्रपूरचे उमेदवारी सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चंद्रपूर येथील सभेत सर्व मर्यादा पार केल्या आहेत. आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

मुनगंटीवार यांची भाषा चिथवणीखोर व दोन समाजांत शत्रुत्व निर्माण करणारी आहे, असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना उद्देशून प्रक्षोभक भाषा आणि अपमानजनक टिप्पणी केली. समाजात द्वेष आणि मतभेद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. मुनगंटीवार यांचे भाषण केवळ आक्षेपार्हच नसून समाजात विषाचे बीज पेरणारे आहे. मुनगंटीवार यांनी भाषणात महिलांबद्दलही अपमानजनक विधाने करून महिलांची बदनामी केली आहे, असे लोंढे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

 

Back to top button