Latest

Odisha train tragedy | ओडिशातील रेल्वे अपघात मार्गावरील वाहतूक पूर्ववत, अश्विनी वैष्णव यांची माहिती

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओडिशातील रेल्वे अपघातानंतर वेगाने मदतकार्य करण्यात आले. ज्या मार्गावर अपघात झाला तो मार्ग खुला करण्यात आला असून वाहतूक पूर्ववत झाली असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघातात २७५ जणांचा बळी गेला. तर शेकडो लोक जखमी झाले. (Odisha train tragedy)

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अपघात मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली असल्याची माहिती दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, रविवारी (दि. ४) रात्री दुर्घटना स्थळावरील मार्ग पूर्ववत करण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांना त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचणे यासाठी आमचा प्रयत्न आहे. आमच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, या घटनेबाबतची अधिक माहिती देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.  (Odisha train tragedy)

दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री सातत्याने घटनास्थळी उपस्थित | Odisha train tragedy

बालासोरमधील भीषण रेल्वे अपघातानंतर रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी दोन ट्रॅकची दुरुस्ती करण्यात आली. घटनेनंतर रेल्वेमंत्री सातत्याने घटनास्थळी उपस्थित होते. रविवारी एका मार्गावरील रेल्वेसेवा सुरू करण्यात आली. मालगाडी निघून गेल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी प्रथम देवाचे आभार मानले आणि नंतर लोकांशी संवाद साधताना म्हणाले की, सर्वांनी खूप चांगले काम केले आहे. ज्या कुटुंबांचे लोक या दुर्घटनेत बळी पडले त्यांच्यासाठी मी खूप दु:खी आहे. मात्र या घटनेच्या मुळाशी जाणार आहोत. जो कोणी दोषी असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. रेल्वे सेवा पुन्हा सुरू केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन. अशी प्रतिक्रिया रेल्वे मंत्री वैष्णव यांनी पहिला मार्ग पूर्ववत केल्यानंतर दिली होती.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT