Latest

हृदयस्पर्शी व्हिडिओ! नर्सनं असं काही केलं की चक्क लकवाग्रस्त रुग्ण नाचू लागला

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे, असे मानले जाते. "रुग्ण जेव्हा उपचारानंतर बरा होतो तेव्हा सगळे डॉक्टर्संना धन्यवाद देतात. पण नर्सेस आणि अन्य मेडिकल स्टाफ ज्या मेहनतीने उपचार करतात त्यांच्यासाठी 'धन्यवाद' हा शब्द छोटा शब्द असतो." अशी कॅप्शन दिलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हृदयस्पर्शी व्हिडिओ मध्ये फिजिओथेरपी (physiotherapy) दरम्यान रुग्णालयातील नर्स एका अर्धांगवायू/लकवा (paralysis patient) मारलेल्या रुग्णाला हाताची हालचाल करण्याचे प्रात्यक्षिक चक्क डान्स करत दाखवते.

फिजिओथेरपी दरम्यान व्यायाम हा एका विशिष्ट पद्धतीने करायचा असतो. त्यात अर्धांगवायू रुग्णांच्या शरिराच्या हालचालीत सुधारणा करण्याचे काम फिजिओथेरपीच्या माध्यमातून केले जाते. व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका रुग्णाला नर्स अगदी उत्साहाने नाचत फिजिओथेरपीचा व्यायाम शिकवत आहे. नर्सने अर्धांगवायू रुग्णाला अभिनव पद्धतीने काही व्यायाम करायला लावल्याचे व्हिडिओत दिसते.

हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी (Indian Police Service officer Dipanshu Kabra) दिपांशू काबरा यांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. या हृदयस्पर्शी व्हिडिओ ने नेटिझन्सची मने जिंकली आहेत. तीन लाखांहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. "आरोग्य, प्रशासकीय, पोलीस, कॉर्पोरेट्स तसेच अनेक क्षेत्रात सपोर्ट स्टाफ खूप महत्वाची भूमिका बजावतात. पण सपोर्ट स्टाफ यांच्या कार्याची दखल घेणे गरजेचे आहे." अशा प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT