Latest

Romance in space : आता अंतराळातही रोमान्स शक्य!

Arun Patil

वॉशिंग्टन : 'चलो दिलदार चलो, चाँद के पार चलो…' जुन्या जमान्यापासूनची अशी प्रेमगीते आता अगदीच काल्पनिक राहणार नाहीत. आता प्रेमक्रीडा, रोमान्स (Romance in space) हे पृथ्वीबाहेरही घडू शकेल. अंतराळात रोमान्स शक्य करण्यासाठी अमेरिकेत तयारी केली जात आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा' एका विशेष मोहिमेवर काम करत आहे. 'नासा'चे अंतराळवीर जोस हर्नांडेझ यांनी या 'स्पेस रोमान्स' प्रकल्पाची माहिती दिली.

या रोमँटिक स्पेस टूरचे बुकिंगही सुरू झाले आहे. यासाठी प्रत्येकी 3 कोटी 75 लाख रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे. म्हणजेच एका जोडप्याला 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करावे लागेल. मीडिया रिपोर्टर्सनुसार, या वर्षाच्या अखेरीस 'नासा'ची सर्व तयारी पूर्ण होईल. अंतराळात रोमान्स (Romance in space) करणे बेकायदेशीर ठरणार नाही. जपानचे उद्योजक व अंतराळवीर यासुका मिजावा यांनीही स्पेस टूरची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प केला आहे. एलन मस्क यांची कंपनी 'स्पेस एक्स'ही चंद्राची सफर घडवली जाणार आहे. ही स्पेस टूर आठवडाभराची असणार आहे. या टूरची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT