Latest

Rakesh Jhunjhunwala : आता राकेश झुनझुनवाला करणार ‘टेक ऑफ’, ‘आकासा एअर’ सेवेला हाेणार जुलैमध्‍ये प्रारंभ

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील दिग्‍गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला  (Rakesh Jhunjhunwala) आता आपली एअरलाइन्स कंपनी सुरू करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या कंपनीचे आकासा एअर असे नामकरण करण्यात आले असून त्यांच्या कंपनीचे पहिले विमान जुलै महिन्यात टेक ऑफ करेल, अशी माहिती डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने  दिली.

(Rakesh Jhunjhunwala)   'डीजीसीए'च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आकासा एअरची सेवा सुरू होण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. कारण एअरलाइनला त्यांचे पहिले विमान जून किंवा जुलैमध्ये मिळण्याची शक्यता आहे. या कंपनीने पहिल्यांदा जूनमध्ये ऑपरेशन सुरू करण्याची योजना आखली होती. नंतर ही योजना जुलैपर्यंत पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एसएनव्ही (SNV) एव्हिएशन म्हणून नोंदणीकृत मुंबईस्थित या विमान कंपनीला अनिवार्य ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. तसेच इतर सर्व प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, असे डीजीसीए अधिकाऱ्याने सांगितले. आकासा एअर कंपनीच्या सूत्रांशी संपर्क साधला असता, जूनच्या मध्यापर्यंत पहिले विमान मिळण्याची अपेक्षा आहे. आणि जुलैमध्ये व्यावसायिक ऑपरेशन सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला आमची पहिली विमाने जून २०२२ च्या मध्यापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. पहिले विमान आम्हाला आमच्या ऑपरेटिंग परमिटमध्ये मदत करेल आणि सिद्ध होणारी उड्डाणे हेल असतील, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT