Latest

अंडरवर्ल्ड डाॅन सुरेश पुजारीला फिलिपिन्समध्‍ये अटक

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंडरवर्ल्ड डाॅन रवी पुजारीसाठी काम करणाऱ्या सुरेश पुजारीला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश मिळालं आहे. २००७ साली त्याने भारतातून पलायन केले होते. तेव्हा पोलीस त्याच्या मागावर होते. सुरेश पुजारीला फिलिपिन्समध्ये अटक करण्यात आली आहे.

१५ ऑक्टोबरला सुरेश पुजारीला अटक करण्यात आली. फिलिपिन्समधून भारताकडे त्याला आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरेश पुजारी हा मुंबई पोलीस, एफबीआय आणि सीबीआयच्या रडारवर होता. २१ सप्टेंबरला सुरेश पुजारी फिलिपिन्समध्ये असल्याची माहिती मिळाली होती.

जेव्हा केंद्रीय तपास यंत्रणांनी याची माहिती इंटरपोलला दिली, त्यानंतर फिलिपिन्सच्या परांकी शहरात एका इमारतीच्या बाहेर तो उभा असताना अटक करण्यात आली. सुरेश पुजारीच्या अटकेमुळे अंडरवर्ल्डमधील सर्वच डाॅन अटकेत आले आहेत. यापूर्वीच छोटा राजन, रवी पुजारी, एजाज लकडावाला यांनादेखील भारतात आणण्यात आलं आहे.

कुख्यात डाॅन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर आणि त्याच्या भाच्याला अटक केल्यामुळे डी-गॅंगच्या गुन्हेगारी कारवाया कमी झालेल्या आहेत. दाऊद गॅंगकडून जे खंडणीसाठी काॅल येत होते. ते आता बंद झालेले आहेत, अशीही माहिती समोर आली आहे.

सुरेश पुजारी कोण आहे? 

कल्याणमधील उल्हासनगरचा असणारा सुरेश पुजारी हा यापूर्वी अंडरवर्ल्ड डाॅन असणाऱ्या रवी पुजारीसाठी तो काम करत होता. २०१२ ला रवी पुजारीसोबत त्याचा वाद झाला. त्यानंतर त्याने स्वतःची गॅंग तयार केली. नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई या भागात असणाऱ्या डान्सबारच्या मालकांना तो खंडणीसाठी फोन करायचा. या दरम्यान खंडणी न देणाऱ्यांची हत्या केल्याच्या घटना घडलेल्या होत्या. २०१८ मध्ये सुरेश पुजारीच्या शुटर्सनी कल्याण-भिवंडी या परिसरात के.एन. पार्क हाॅटेलमध्येही गोळ्या चालवल्या होत्या. त्यात काही जण जखमीदेखील झाले होते.

पहा व्हिडीओ : कोल्हापुरच्या कस्तुरी सावेकरने सर केले मनस्लू शिखर…

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT