Latest

“… तर अमेरिका, द. कोरियाला नष्‍ट करा” : उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांची पुन्‍हा सटकली

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : प्रक्षोभक कारवाई किवा चिथावणी दिली तर अमेरिका आणि दक्षिण कोरियाने पूर्णपणे नष्ट करा, असा आदेश उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी देशातील लष्‍कराला दिले आहेत. तसेच त्‍यांनी राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यावरही भर दिला असल्‍याचे उत्तर कोरियाच्‍या स्‍थानिक माध्‍यमांनी म्‍हटले आहे.

उत्तर कोरियातील सत्ताधारी पक्षाची बैठक किम जोंग उन यांच्‍या अध्‍यक्षतेखाली गेली आहे. यावेळी बोलताना किम जोंग उन म्हणाले की, मागील नोव्हेंबरमध्येच उत्तर कोरियाने आपला पहिला लष्करी गुप्तचर उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला होता. २०२४ या वर्षात आणखी तीन लष्करी गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

किम जोंग उन यांनी उत्तर कोरियाच्या लष्कराच्या कमांडिंग अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत ते म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षेसाठी आपली लष्करी तयारी मजबूत करण्याची गरज आहे. आमच्या सैन्याने आवश्यक ती सर्व पावले उचलली पाहिजेत. आमच्‍याविरुद्‍ध कारवाई करणाऱ्या देशांचा पूर्णपणे नाश केला पाहिजे. त्यासाठी कोणताही संकोच करु नका, असे आवााहनही त्‍यांनी केले आहे.

उत्तर कोरियाकडे सुमारे १०० अणुबॉम्ब असल्याचा संशय

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन चीन आणि रशियासोबत आपले सैन्य मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर कोरियाकडे 20-30 अणुबॉम्ब ते 100 पेक्षा जास्त बॉम्ब असू शकतात. अनेक संरक्षण तज्ञांचे मत आहे की उत्तर कोरियाला अजूनही काही तांत्रिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. हा देश आंतरखंडीय क्षेपणास्त्रे बनवण्यात यशस्वी होऊ शकला नाही. मात्र, त्याची कमी पल्ल्याची आण्विक क्षेपणास्त्रे जपान आणि दक्षिण कोरियाला लक्ष्य करू शकतात.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT