Latest

No-confidence Motion : ‘मी आहे ना…’ लोकसभा अध्‍यक्षांनी सर्व सदस्‍यांना केले आश्‍वस्‍त

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभेत आज केंद्र सरकारविरोधातील अविश्‍वास प्रस्‍तावावर चर्चा सुरु होण्‍यापूर्वीच गदारोळ झाला. विराेधकांसह सत्ताधारी सदस्‍य आक्रमक झाले. यावेळी लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला ( Lok Sabha speaker Om Birla) यांनी सर्व सदस्‍यांना शांततेचे आवाहन केले. अविश्‍वास प्रस्‍ताव हा गंभीर विषय आहे. सर्वांनी याचे महत्त्‍व जाणून घ्‍या, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.
(No-confidence Motion)

अविश्‍वास प्रस्‍ताव पूर्वी सत्ताधारी-विरोधकांमध्‍ये खडाजंगी

आसाम काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्‍यक्ष यांच्‍यातील बंद दाराआड काय चर्चा झाली, याची माहिती द्‍या, अशी मागणी अविश्‍वास प्रस्‍तावावर चर्चा सुरु होण्‍यापूर्वी केली. यावर भाजप सदस्‍यांनी तीव्र आक्षेप घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही संताप अनावर झाला. त्‍यांनी अशा प्रकारे विरोधी पक्ष सभागृहात मागणी करु शकत नाहीत, असे स्‍पष्‍ट केले. यावर विरोधी पक्षाचे सदस्‍य आक्रमक झाले.

अविश्‍वास प्रस्‍ताव हा गंभीर विषय : लोकसभा अध्‍यक्ष

अविश्‍वास प्रस्‍ताव हा गंभीर विषय आहे. सर्वांनी याचे महत्त्‍व जाणून घ्‍या. मी येथे आहे ना, असे सांगत त्‍यांनी सर्व सदस्‍यांना आश्‍वस्‍त केले. अविश्‍वास प्रस्‍ताववरील चर्चेला प्रारंभ करण्‍याचे आवाहन केले. त्‍यांनी केलेल्‍या आवाहनानंतर अविश्‍वास प्रस्‍तावाला प्रारंभ झाला. आसाममधील काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी चर्चेला प्रारंभ केला. (No-confidence Motion)

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT