Latest

‘नितीन गडकरी धमकी प्रकरण’, आरोपीचा दाऊद आणि पीएफआय संबंध; युएपीए कायद्यांतर्गत होणार गुन्हा दाखल

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाइन : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जयेश पुजारी उर्फ शाकीर याने नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात फोन करून धमकी दिली होती. या धमकी प्रकरणी आता युएपीए कायदा लागू करण्यात येणार आहे. या धमकी प्रकरणामधील आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीर याच्यावर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली.

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नागपूर कार्यालयात फोन करून धमकी देणाऱ्या जयेश पुजारी याचे संबंध प्रतिबंधित संघटना पीएफआयशी (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) असल्याचे पोलीस तपासात समोर आले. यामुळे आता त्याच्यावर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी देखील त्याचे संबंध आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जयेश पुजारी याने बेळगाव तुरुंगातून 14 जानेवारी आणि 21 मार्चला गडकरी यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात फोन केला. यावेळी पहिल्‍या वेळी 100 कोटी आणि दुस-यावेळी 10 कोटींची मागणी केली. खंडणी जर दिली नाही तर नितीन गडकरी यांना जीवे मारू, असा फोन पुजारी याने केला होता. आरोपी पुजारी याचे अनेक संघटनांशी संबंधही आहेत. तसेच आता त्‍याच्यावर युएपीए कायद्यांतर्गत होणार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली.

.हेही वाचा 

SCROLL FOR NEXT