निपाणी; पुढारी वृत्तसेवा पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाट उतारावरील हॉटेल अमरनजीक लाकूड वाहतूकीचा ट्रक पलटी झाला. या अपघातामध्ये सुमारे 5 लाखा रूपयांचे नुकसान झाले. हा अपघात सोमवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास झाला. यामध्ये चालक व क्लिनर दोघेही गंभीर जखमी झाले.
फारुख अलीभाई (वय 48) व क्लीनर अजुबा (वय 35) रा.कोलार अशी दोघा जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त ट्रकमधून चालक फारूक हा लाकूड भरून कोलार येथून अहमदाबाद (गुजरात) येथे जात होता. त्याचे वाहन तवंदी घाट उतारावर आले असता, नियंत्रण सुटल्याने वेगात असलेला ट्रक रस्त्याच्या विरुद्ध दिशेला दुभाजकावर आदळून पलटी झाला.
यामध्ये चालक फारूक व क्लीनर अजूबा हे दोघे अडकून पडल्याने गंभीर जखमी झाले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच रस्ते देखभाल औताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना पाचारण केले. त्यानुसार घटनास्थळी शहर पोलीसांनी भेट देऊन पाहणी केली. या अपघातामुळे बेळगावहून कोल्हापूरकडे होणारी वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. ती पोलीस कर्मचारी व रस्ते देखभाल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सुरळीत करून दिली.
हेही वाचा :