Latest

तीन महिन्यांनी देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या लेकीचं नाव ठरलं ! नावामध्ये ‘मराठी’ कनेक्शन

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन; बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आणि निक जोनास गेल्या जानेवारीच्या सरूवातीला सरोगसीच्या माध्यमातून पालक झाले आहेत. यानंतर दोघांनी बाळाच्या जन्मापासून आतापर्यंत कोणतीही माहिती शेअर केले नसल्याने चाहत्यांना अनेक प्रश्न पडले होते. याच दरम्यान प्रियांकाने लेकीचं नाव आणि जन्म तारखेचा मोठा खुलासा केला आहे.

नुकतेच प्रियांकाच्या मुलीला जन्म प्रमाणपत्र मिळाले असून यातून तिच्या बाळाचे नाव आणि जन्म तारखेचा खुलासा झाला आहे. सुत्राच्या माहितीनुसार, प्रियांकाने स्वत: च्या मुलीचे नाव ''मालती मेरी चोप्रा जोनास' (Malti Marie Chopra Jonas) असे ठेवले आहे. तर जन्म तारीख २२ जानेवारी २०२२ रोजी असल्याचे सागितले आहे. प्रियांकाने मुलीच्या नावात खास करून दोन्ही अडनावाचा समावेश केला आहे. यावरून हिंदू धर्मानुसार 'मालती चोप्रा' आणि ख्रिस्ती धर्मानुसार 'मेरी जोनास' असे नाव ठेवण्यात आले आहे. तसेच मालतीचा जन्म २२ जानेवारी २०२२ रोजी सॅन डिएगो कॅलिफोर्निया येथे रात्री ८ नंतर झाल्याचे सांगितले आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी गेल्या जानेवारी महिन्यात सरोगसीद्वारे पालक बनल्याची घोषणा केली होती. यानंतर सोशल मीडियावरील सर्व चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. परंतु, यानंतर प्रियांका आणि निकने बाळाच्या नावाची कोणतीच माहिती चाहत्यांना शेअर केली नव्हती. यानंतर चाहत्यांनी अनेक तर्क- वितर्क लावले होते. तर चार महिन्यानंतरही जन्म दाखल्यावरून प्रियांकाच्या लेकीच्या नावाचा खुलासा झाला आहे.

प्रियांका-निकच्या मुलीच्या नावाचा अर्थ असा आहे

प्रियांका आणि निक यांनी आपापल्या परंपरेचा आदर केला आहे कारण त्यांनी 'मालती' आणि इंग्रजी मधले नाव 'मेरी' निवडले आहे. 'मालती' हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ लहान सुवासिक फूल, चांदणी असा होतो. तर 'मेरी' हा फ्रेंच शब्द आहे ज्याचा अर्थ 'समुद्राचा तारा' असा होतो.

याच दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी सांगितले होते की, 'प्रियांका आणि निक यांनी अद्याप त्यांच्या मुलीचे नाव ठरविलेले नाही. मी आजी झाल्याने मला आनंद झाला आहे'. असे म्हटले होते. प्रियांका आणि निकने २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली होती. राजस्थानमधील जोधपूर येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले होते.

SCROLL FOR NEXT