Latest

Kia Carens भारतात लॉन्च, जाणून घ्या काय आहे किंमत

अमृता चौगुले

Kia ने देशात Carens MPV ही नवीन कार लाँच केली आहे. याच्या किंमती 8.99 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होवून 16.99 लाखापर्यंत आहेत. २५ हजार रुपये भरून या गाडीचे बुकिंग गेल्या महिन्यापासून सुरू झाले आहे. ही गाडी आठ रंग आणि पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

कशी आहे Kia Carens

  • इंजिन
    Kia Carens मध्ये पॉवरट्रेनमध्ये सहा- स्पीड मॅन्युअल आहे. तर 1.5-लीटर NA पेट्रोल मोटर, 112bhp आणि 144Nm टॉर्क निर्माण होते. तसेच 1.5 लीटर डिझेल इंजिन असनू सहा-स्पीड गेअर मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. 112bhp आणि 250Nm टॉर्क. तसेच ऑफरमध्ये 1.4-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन असेल जे की 136bhp आणि 242nm टॉर्क निर्माण करते, जे सात-स्पीड गेअर DCT युनिटशी जोडलेले आहे.
  • बाहेरील बाजू

या कारच्या बाहेरील बाजूस 2022 च्या मॉडेल किआ केरेन्समध्ये एलईडी हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, आइस क्यूब-आकाराचे एलईडी फॉग लाइट्स, 16-इंच ड्युअल-टोन अॅलॉय व्हील, छतावरील रेल, रॅप-अराउंड एलईडी टेललाइट्स, एकात्मिक हाय-माउंट आहे. स्टॉप लाईट आणि मागील बंपरसाठी एक मोठा क्रोम आहे.

  • आतील बाजू

 Kia Carens MPV इलेक्ट्रिक सनरूफ, Apple CarPlay आणि Android Auto सह 10.25-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जिंग, एक पूर्ण-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, हवेशीर फ्रंट सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल यासारख्या अनेक वैशिष्ट्यांसह सज्ज आहे. कूलिंग फंक्शनसह वायरलेस चार्जिंग आणि एलईडी लाईट उपलब्‍ध आहे.

  • सुरक्षेसंबंधी

Kia Carens मध्ये उपलब्ध असलेल्या सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये एकूण सहा एअरबॅग्ज आहेत. EBD सह ABS, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, स्पीड-सेन्सिंग डोअर लॉक फंक्शन, इम्पॅक्टिंग-सेन्सिंग डोअर ऑटो-अनलॉक, रिअर पार्किंग सेन्सर्स आणि TPMS यांचा समावेश आहे. MPV पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.

  • किंमत

पेट्रोल मॉडेलची किंमत – MT प्रीमियम : 8.99 लाख रुपयांपासून सुरू होत असून ती 16.99 लाखापर्यंत आहे.
डिझेल मॉडेलची किंमत- MT प्रीमियम : 10.99 लाखांपासून सुरू होत असून ती 16.99 लाखांपर्यंत आहे.

हे ही वाचलं का  

SCROLL FOR NEXT