Latest

Zomato Pure Veg Fleet : झोमॅटो कंपनीच्या हिरव्या रंगातील टी शर्टचा फोटो व्हायरल! कारण ग्राहकांना मिळणार ‘ही’ नवी सुविधा

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो कंपनीने (Zomato Introduces) 'प्युअर व्हेज मोड' (Zomato Pure Veg Mode) आणि 'प्युअर व्हेज फ्लीट' (Zomato Pure Veg Fleet) ही नवीन सुविधा लॉन्च केली आहे. या नव्या सुविधेनंतर  शाकाहारी ग्राहकांना केवळ शाकाहारी हॉटेलमधून खाद्यपदार्थ मागवणे सोपे जाणार आहे. देशभरातील शाकाहारी ग्राहकांच्या मागणीस प्रतिसाद देत कंपनीने हे पाऊल टाकले आहे. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे Twitter) वर ही माहिती दिली. तसेच, त्यांनी ग्राहकांची मागणी आणि विविध आहारातील प्राधान्ये पूर्ण करण्यासाठी कंपनीच्या वचनबद्धतेवर जोर दिला.

दीपंदर गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाकाहारी ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात, झोमॅटोने 'प्युअर व्हेज मोड' सादर केले आहे. जे केवळ शाकाहारी जेवण देणाऱ्या रेस्टॉरंट्सची निवड करते. भारतामध्ये शाकाहारी नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या नागरिकांच्या आणि ग्राहकांच्या मागण्या विचारात घेऊन सेवा देणे आवश्यक होते. त्यामुळे आम्ही ही महत्त्वाची प्रणाली सुरु केल्याचे ते म्हणाले.

गोयल यांनी स्पष्ट केले की नवीन सेवा शाकाहारी खाद्यपदार्थांवर लक्ष केंद्रित करते. असे असले तरी आम्ही कोणत्याही प्रकारे धार्मिक किंवा राजकीय भूमिका अथवा मतांना अनुसरुन अथवा त्यावर आधारित भेदभाव करत नाही. आमच्यासाठी सर्व ग्राहक समान आहेत. फक्त त्यांच्या आवडीनिडीनुसार खाद्यपदार्थ त्यांना ऑर्डर करता यावे यासाठी ही सेवा आहे. त्यांनी ग्राहकांना आश्वासन दिले की 'प्युअर व्हेज मोड' आणि 'प्युअर व्हेज फ्लीट' हे सर्वसमावेशक उपक्रम आहेत ज्यांची रचना शाकाहारी आहाराची प्राधान्ये असलेल्या व्यक्तींसाठी जेवणाचा अनुभव वाढवण्यासाठी केली गेली आहे.

झोमॅटो ही एक ऑनलाईन ऑर्डर स्वीकारुन ग्राहकांना खाद्यपदर्थ पूरवणारी कंपनी आहे. ही कंपनी संपूर्ण भारतातील प्रमुख शहरांमध्ये सेवा देते. त्यासोबतच जगभरातील इतरही काही देशांमध्ये कंपनीने अलिकडे आपले जाळे निर्माण केले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT