नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सरत्या मार्च महिन्यात 42.22 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली असल्याची माहिती व्यापार मंत्रालयाकडून बुधवारी देण्यात आली. गतवर्षीच्या मार्च महिन्यात हाच आकडा 34.57 अब्ज डॉलर्स इतका होता. थोडक्यात मार्चमधील निर्यातीत 19.76 टक्क्यांची वाढ झाली आहे. याच कालावधीत आयात 24.21 टक्क्याने वाढून 55.45 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 60.74 अब्ज डॉलर्सवर गेली आहे. व्यापारतुटीचा आकडा कमी होऊन 20.88 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 18.51 अब्ज डॉलर्सवर आला आहे.
मार्चमध्ये हिरे आणि दागिन्यांची निर्यात 3.17 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 3.78 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. दुसरीकडे सोन्याची आयात 4.78 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत कमी होऊन 1.04 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. खाद्यतेलाची आयात 1.36 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 1.73 अब्ज डॉलर्सवर गेली आहे. कच्चे तेल, पेट्रोलियम पदार्थ, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कोळसा आदी वस्तुंची भारताला मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते. मोठ्या व्यापार तुटीसाठी हे कारण जबाबदार असल्याचे आयात-निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा :